समाजाच्या सामाजिक स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक – संजय ठोके
सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

समाजाच्या सामाजिक स्वास्थ्य व पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक आहे,असे प्रतिपादन कासुबाई दावल ठोके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि बांध वाचवा, बांध वाढवा, पर्यावरण जगवा मोहीमेचे प्रणेते संजय ठोके यांनी जागतिक ओझोन दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगी गड येथे आपल्या भाषणात केले. माती व पाणी ही नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. माती तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात परंतू अलिकडे ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांमध्ये पाण्या प्रवाह बरोबर गाळाचे प्रमाण वाढत आहे,जलाशयात गाळाचे प्रमाण वाढत जावून पाण्याची साठवण क्षमता कमी होत आहे. राज्य शासनाने काही धरणांमधील गाळ काढण्याचे नियोजन आहे. तणनाशाक फवारणी मुळे व बांध कोरण्यामुळे झाडे व वनस्पतीचे आच्छादन नसल्यामुळे माती वाहून जात आहे. भविष्यातील धोके ओळखून आजपासून माती व पाणी ही साधनसंपत्ती संवर्धनासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे संजय ठोके म्हणाले,यावेळी जाधव सर, केदारे सर, पवार सर, दळवी सर राजेंद्र ठाकरे, आकाश सोनवणे आदि उपस्थित होते