एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा उप केंद्र
प्रतीनीधी सचीन वखारे

अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दि.२८ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा २०२२ चे उप केंद्र देण्यात आले आहे.या केंद्रात मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल,अंदरसुल.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे सेमी इंग्लिश मिडीयम स्कुल,अंदरसुल व मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय, अंदरसुल.असे तीन विद्यालयाचे एलिमेंटरी (१४५ विद्यार्थी) व इंटरमिडिएट (८८ विद्यार्थी) एकूण = २३३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहे.या परीक्षेसाठी बैठक व्यवस्था शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. यात एलिमेंटरी परीक्षेचे बैठक क्रमांक- E103023/0453 पासून ते E103023/0656 पर्यंत आहे.चार दिवस चालणाऱ्या परीक्षेत एकूण दोन सत्रात पेपर होईल.पहिला पेपर सकाळी-10.30 पासून ते दुपार- 01.00 पर्यंत व दुसरा पेपर दुपार-02.00 पासून ते 04.00 पर्यंत.अशी माहिती शाळेचे प्रिन्सिपल व उप केंद्र संचालक अल्ताफ खान यांनी दिली.