लासलगाव चा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व शिष्टमंडळाला दिली ग्वाही
संपादक राहुल वैराळ

लासलगाव विंचूर सह सोळागाव पाणीपुरवठा महीन्यापासुन ऐन पावसाळ्यात बंद असल्याने महीलांची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. अधिका-यांनी कागदी घोडे नाचविले. वरीष्ठ पुढा-यांनी घोषणा केल्या.परंतु घोटभर पाणी लासलगांवकरांना मिळालेले नाही. या संदर्भात नुकत्याच नुतन पालकमंत्री दादाजी भूसे साहेब यांची लासलगाव शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भूसे साहेबांची मालेगांव येथे भेट घेत कैफियत मांडली.त्यावेळी भूसे साहेबांनी यांनी पिण्याचा पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचे आश्वासित केले.
लासलगाव हे आमदार छगनराव भुजबळांच्या मतदारसंघात येते. या अगोदर प्रकाश पाटील यांनी खासदार डॉ केंद्रीय आरोग्य मंत्री भारती ताई पवार यांचेकडे निवेदन देऊन लक्ष वेधले असता,तात्काळ आमदार छगनराव भूजबळ यांनी अधिका-यांसमवेत लासलगाव ग्रामपंचायत येथे बैठक घेतली होती. परंतु आज महीना उलटुनदेखिल पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वंचित आहे . लासलगाव विंचूर सह सोळा गाव देखभाल दुरुस्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ऐन पावसाळ्यात देखील लासलगांव विंचूर सह पाणीपुरवठा योजनेचे लाभार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करताना दिसत आहे नागरिक तहानलेलेच आहे.
सदर पाणीपुरवठा योजना तात्काळ दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाच महिन्यापूर्वी तातडीची बैठक लावून पंधराव्या वित्त आयोगातुन लासलगांव ग्रामपंचायत 25 लाख ,विंचुर 22 लाख ,पिंपळगांव नजिक 9 लाख , टाकळी विंचूर 7 लाख एकूण अंदाजे 64 लाख खर्च करण्याचे प्रस्तावित असुन घोडे कुठे अडले तेच जनतेला समजत नाही. ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या निदर्शनास आणून दिली. भूसे साहेबांनी सबंधित अधिका-यांना पाईपलाईन तात्काळ दुरुस्ती करून ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले . तसेच या नवीन पाईपलाईनसाठी विस कोटी रुपये मंजूर असुन याबाबतही पालकमंत्री दादाजी भूसे साहेबांनी अधिका-यांशी चर्चा करून काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचना केल्या त्यामुळे लासलगांव विंचूर सह सोळागाव पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल व कित्येक वर्षापासून चा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी आशा जनतेला आहे.
शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील ,सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे ,कांदा व्यापारी प्रवीण कदम, विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भैय्या नाईक उपस्थित होते.
फोटो- पालकमंत्री दादाजी भूसे साहेब यांची मालेगांव येथे भेट घेऊन पिण्याच्या पाणी प्रश्नाबाबत कैफियत मांडताना शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे ,कांदा व्यापारी प्रवीण कदम ,विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भैय्या नाईक