ताज्या घडामोडी
लम्पी रोगाबाबत खबरदारी व लसीकरण आवश्यक….. मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर
हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी लम्पी आढावा दौऱ्यात दिली रांगोळी गावास भेट
लम्पी या साथीच्या रोगाने हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. याची लागण रांगोळी या गावातील सादळे यांच्या गोठ्यातील अनेक जनावरांना झालेली आहे. तर ७ जनावरे देखील दगावली आहेत. लम्पी आढावा दौऱ्यात त्यांच्या गोठयाला भेट देवून योग्य ती खबरदारी व लसीकरण करण्याच्या सूचना यावेळी माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिल्या. तसेच यावेळी पशुपालकांनी आपला गोठा स्वच्छ ठेवावा, गोठयात डास माश्या व गोचीड निर्मूलनासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, सायंकाळी गोठयात कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करावा तसेच हवा खेळती सोडावी असेही ते म्हणाले.
यावेळी उपसरपंच तानाजी सादळे, रमेश पाटील, दिपक मोरे, किशोर निकम, सुशांत भोसले, पांडुरंग सौदलगे पाहणी करताना उपस्थित होते.