रांगोळी येथे डॉ.कर्मवीर पाटील जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न
हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

रांगोळी
येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ( आमदार फंड ) गावातून शाळेकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण तसेच शाळेजवळ असणाऱ्या स्मशानभूमीस कंपौड बांधून दिल्याबद्दल मा.आमदार डॉ. मिणचेकर यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी बाबुराव सादळे,भारत गाट,सुभाष देसाई,अनिल शिरोळेकर (माजी सरपंच),बापुसो मुल्लानी (माजी सरपंच), ताणाजी सादळे (उपसरपंच), दिपक पाटील,किशोर निकम,महावीर शेट्टी सर,रमेश पाटील,दिपक मोरे, प्रफुल्ल मगदूम,पांडुरंग सौदलगे,सुशांत भोसले,मुख्याध्यापक अनिल कलाजे,सुनील प्रज्ञासागर सर तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.