ताज्या घडामोडी

लोणार पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न

लोणार प्रतिनिधी

आज दिनांक 24 सप्टेंबर 22रोजी आगामी काळातील सण उत्सवा संदर्भात लोणार पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती
नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी व इतर सणानिमित्त लोणार पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी आगामी काळातील येणारे सण हे शांततेत व जातीय सलोखा पाळून साजरे करावे व शासनाच्या नियम पालन करावे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप ठाकूर यांनी केल्या यावेळी प्रा. गजानन खरात,नगरसेवक अनिल मापारी, नगरसेवक गजानन जाधव, भाजप नेते विजय मापारी, हाजी एम. ए.नसीम, अन्नू कुरेशी,भाजप शहर अध्यक्ष गजानन मापारी, शाम राऊत, दिनकर जाधव, मनू मोरे, सतिष मुलगे, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,सामाजिक कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, पत्रकार, पोलीस बांधवांना सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!