तंबाखू मुक्त शाळा केल्या बद्दल रावेर बीआरसी कडुन मुख्याध्यापक जफर खान यांचा सत्कार
सावदा प्रतिनिधी मोहसिन शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील अलक्वी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी द्वारे संचालित खाजगी उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक जफर खान बशारत खान यांनी तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत यशस्वीरित्या कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकतेच याची द केल्याने दि.२० सप्टेंबर २०२२ बुधवार रोजी रावेर (B.R.C) येथे राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमात सदरील शाळेस तंबाकू मुक्त श्रेणीत आणल्याबद्दल मुख्याध्यापक जफर खान बशारत खान यांचे सन्मान पूर्व सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक शिक्षक श्री संजय ठाणगे जिल्हा प्रकल्प समन्वयक सलाम,मुंबई फाउंडेशन मुंबई, राज मोहम्मद सिकलगर जनमानवता बहुउद्देशीय संस्था, श्री प्रफुल मानकर तालुका समन्वयक इत्यादी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.
तरी संस्थेचे अध्यक्ष सैय्यद अजगर सैय्यद तुकडू,सचिव अय्युब खान दलमीर खान,उपाध्यक्षा युसुफ शाह,सह असद सर,शाकिर सर,सादीक सर,दानिश सर,अश्रफ सर,सद्दाम सर,शिक्षिका नबिला फातेमा यांनी मुख्याध्यापक जफर खान बशारात खान यांचे अभिनंदनन केले.