महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व नवी मुंबई महानगरपालिका प्रदूषण निरीक्षक यांचा दुर्लक्षामुळे घणसोली रहिवाशांचे आरोग्य धोक्यात….
प्रतिनिधी :- सुबोध सावंत

घणसोली (बातमीदार ) घणसोली सेक्टर नंबर 6 ते 9 येतील रासायनिक द्रव्यांची नाल्याबाबत तक्रार श्री देवानंद खिलारी यांनी दि. फेब्रुवारी/2022 रोजी सर्व प्रथम नवी मुंबई महानगरपालिका विभागिय कार्यालय घणसोली यांच्याकडे करण्यात आले. परंतु स्वच्छता विभाग घणसोली यांनी आमचा वरची जिम्मेदारी आमी संपूर्ण पार पाडून नाला साफ सफाई, गाळ, माती संपूर्ण आमची जीमेदारी पार पडली आहे. नाल्याची दुर्गंधी व सांडपाणी हें रासायनिक कंपनी चे हानिकारक रासायन द्रव्य वाहत जात नाही व ते एकाच ठिकाणी जमा होत आहे त्यामुळे नाल्याची दुर्गंधी त्रास होत आहे असे कळविण्यात आले.तक्रारीच्या अनुषंगाने विचारना केली असतात. नवी मुबंई महानगरपालिका, प्रदूषण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ महापे हें एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. त्यामुळे नेहमी तक्रार दार यांचा मनात हमेशा संशय निर्माण झाला असं मत तक्रारदाराने मांडले. परंतु तक्रारदार यांनी एक सतर्क नागरिक व रहिवाशी म्हणून पाठपुरावा करायचा सोडला नाही. त्यामुळे सदर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांनी नाल्याच्या पाण्याचे नमुने घेऊन गेले. त्या नंतर अहवाल प्राप्त झाला. त्या अहवालामध्ये सिद्ध झाले कि,
माणसाच्या आरोग्यास घातक असलेले रासायनिक घटक जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका आहे हें सिद्ध झाल्यावर काही तरी कार्यवाही करायची म्हणून कंपन्यांचे तुटलेले गटार दुरुस्त करण्यात आली असे दाखऊन तक्रारदार ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला व तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला. परंतु तक्रारदार देवानंद खिल्लारी हे काही गप्प बसले नाही ई-मेल द्वारे पत्र व्यवहार व पाठपुरावा करत राहिले.. चार महिन्यांनी याची दखल परत घेण्यात आली.
दि.30/8/2022 रोजी परत एकदा देवानंद खिलारी यांचा ऑनलाइन तक्रारी च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका प्रदूषण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ याची संयुक्त पणे कारवाई व पाहणी करून अर्जुन वाडी ,ते सेक्टर नंबर 6,7, येथील नाला एम आय डी सी रिलायन्स गेट बी संयुक्त पने पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले हें नमुने सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यानचे घेतले गेले तसेच तक्रारदार यांचे म्हणण्यानुसार सायंकाळी ही पाण्याचे नमुने घ्यावे असे म्हणेने मांडले गेले समक्ष अधिकारी यांच्यासमोर नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी एमआयडीसी अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अधिकारी
तक्रारदार :- देवानंद खिल्लारे
पत्रकार:- सुबोध सावंत
न मु म पा अधिकारी
1) दीपक नगराळे :- उप अभियंता
2) राघवेंद्र पास्ते :- प्रदूषण निरीक्षक
3) बळीराम जाधव:- कनिष्ठ अभियंता
4) संजय पाटील:- स्वच्छता निरीक्षक
एम आय डी सी अधिकारी
1) प्रशांत चौधरी:- सहाय्यक अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
1) विक्रम भालेराव :- उप प्रादेशिक अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत पाहणी व पंचनामा झाला. परंतु आज पर्यंत पाहणी अहवाल आलेला नाही यांची दखल घेतली जात नाही.
त्यामुळे तक्रारदार यांनी cmo कार्यालय मंत्रालय मुबंई, येते तक्रार करून दाद मागितली आहे