हेरले ग्रामपंचायत मध्ये 14 व्या वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार गावकऱ्यांचा आरोप,,,,,,,,,,,,,,,,,,,
प्रतिनिधी संतोष कोठावले

फिरले तालुका हेरले तालुका हातकणंगले या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने चौदाव्या वित्त आयोगामधील खरेदी केलेल्या डस्टबिन खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर कायदेशीर करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे दिनांक 13 12 २०२१ रोजी गावातील बाळगोंडा पाटील अमरसिंह इंदिरा वड अश्फाक रफिक देसाई विशाल रावसो परमाज इब्राहिम खतीब या ग्रामस्थांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 17 12 2021 रोजी गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते नुसार गट विकास अधिकारी यांनी प्रकरणाची चौकशी केली परंतु त्यांनी याबाबत कोणतेही पत्र नोटीस व पुरावे याबाबत तक्रारदार यांना कोणती ही संधी दिली नाही परस्पर चौकशी करून सरपंच ग्रामसेवक व स्थानिक नेते यांनी सदरचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालवला होता असा आरोप तक्रारदार ग्रामस्थांनी केला आहे आहे अधिक माहिती अशी,
ग्रामपंचायतच्या 14 व्या वित्त आयोगातून कोरोना काळात गावातील ग्राम नागरिकांना कचराकुंडी व डस्टबिन वाटप करण्यासाठी चार लाख 99140 इतका खर्च दाखवण्यात आला आहे दाखवण्यात आला आहे त्यानुसार प्रति नग डस्टबिन 180 रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी असा एकूण दर 212 रुपये 40 पैसे या दराने सिद्धिविनायक टोटल सोल्युशन या हेरले स्थित या पुरवठादाराकडून खरेदी केलेली आहे परंतु वाटप केलेल्या डस्टबिन वरती एमआरपी रुपये 160 प्रति नग इतकी आहे व ठेकेदाराने जे बिल दिलेले आहे त्या बिलावरती बिल नंबर व तारीख याचा उल्लेख दिसत नाही यावरून ग्रामपंचायतीने खुलासा केल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी चौकशी केली असता कचराकुंडीच्या व्यवहारामध्ये तफावत असल्याचे दिसते परंतु यावर ठोस अशी कारवाई न करता फक्त संबंधित ठेकेदाराकडून रुपये एक लाख 23 हजार 140 इतकी रक्कम वसूल करून संबंधित निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत मात्र या घोटाळ्यामध्ये जे जे सामील आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही म्हणून तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळल्यास शासन परिपत्रक क्रमांक व्ही पी एम 2016 व शासन शुद्ध शुद्धिपत्रक व्ही पी एम 2019 प्र क्र 281 दिनांक 18 9 2019 नुसार जबाबदार सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे पत्रकार परिषदेला बाळगोंडा पाटील निलोफर खतीब अमर वड्ड अजित पाटील अशपाक देसाई विशाल परमाज सचिन जाधव खाबडे व ग्रामस्थ उपस्थित होते