वसई विरार मनपा हद्दीतील रखडलेल्या नारंगी येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांची भेट.
सुहास पांचाळ/ पालघर जिल्हा प्रतिनिधी

विरार / दि.२२.०९ : विरार पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नारिंगी फाटक रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असून, अजूनही हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. केंद्र सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर योजेने अंतर्गत, केंद्र सरकार व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य याच्या माध्यमातून सदर उड्डाण पूलाचे काम सुरु आहे.
आजमितीस अस्तित्वात असलेल्या विरार पूर्व – पश्चिमेस जोडणारा रेल्वे हा उड्डाण पूल केवळ हलक्या वाहनासाठी उपलब्ध असून, या एकमेव उड्डाण पुलावर कायम वाहतूक कोंडी होऊन केवळ ५०० मीटर अंतर कापण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तास वेळ जातो. नारिंगी फाटक उड्डाण पूल पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली असून वाहनचालक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
या विषयावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवी पुरोहित, गुरजीत अरोरा, कपिल म्हात्रे, आशिष जोशी, पंकज नंदवाना यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. रविंद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले व सदर उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी विनंती केली.
मा. मंत्री महोदयांनी विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावण्याचे निर्देश दिले.
यामुळे या उड्डाणपुलाच्या कामास गती मिळून काम लवकरात लवकर पूर्ण होऊन वाहनचालक व नागरिकांना दिलासा मिळेल असा ठाम विश्वास आहे.