राज्य शासनाने पशुपालक व शेतकऱ्यांना भरघोस अशी तोरीत नुकसान भरपाई द्यावी युवा महाराष्ट्र सेनेची मागणी
प्रतिनिधि,संतोष कोठावले

लंम्पि वायरस मध्ये मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची शेतकर्यांना प्रत्येकी जनावराचे एक लाख मदत होणेसाठी प्रातांधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना सादर करणारे निवेदन देण्यात आले निवेदन युवा महाराष्ट्र सेना यांच्याकडून इचलकरंजी येथे प्रांत अधिकारी कार्यालयीन समोर प्रांताधिकार्यांना देण्यात आले ते पुढील प्रमाणे
आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकर्यांची शेतीचा जोड व्यवसाय म्हणून पाळलेली जनावरे आहेत.स्वताच्या मुला प्रमाणे शेतकरी व जनावरे सांभाळणारे लोक जनावरांच्या वर प्रेम करतात. लंम्पि वायरस मुळे अनेक जनावरे मृत्यूमुखी पडल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
सरकार ने त्यात शेतकर्यांची चेष्टा करत दुधाच्या जनावराचा मृत्यू झालेस 30 हजार, ओढकाम करणारे जनावर (बैल) मृत्यूमुखी पडलेस 25 हजार,छोटी जनावरे मृत्यूमुखी पडलेस 16 हजार रूपये असे जाहीर केले आहे. परंतु सत्यता पाहता ओढकाम करणारे, दुधालु जनावराची किमत एक लाख पेक्षा अधिक आहे.शेतकर्यांच्यावर आधिच जास्त पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.काही ठिकाणी पीक उगवलेच नाही.पिकाला भाव नाही असे अनेक समस्यांना तोंड देत असताना त्यात जनावरांच्या लंम्पि वायरस मुळे जनावरे मृत्यूमुखी पडली जात आहेत.
तरी शेतकर्यांची व्यथा समजून घेऊन प्रती जनावर एक लाख रुपये सरकारने जाहीर करावे ही नम्र विनंती करण्यात आली व या मागण्याचे निवेदन देताना साॅम आठवले .राहुल लोकरे. सचिन पाटील .तोफिक इनामदार. राजू दंडी. सदाशिव बंडगणी. सतीश कवडे .आनंदा नाईक .जावेद सनदी. अभिषेक घोडगिरे. मुदस्सर जमादार. अरबाज मुजावर. पारस निरणे .रवींद्र कवडे. प्रशांत बडीगणी .समीर निवडे. दीरु माने .नौशाद सनदी.गणेश भोरे.वसीम मुजावर .यावेळी उपस्थित होते