लोणार पंचायत समितीचा भोंगळ कारभार उध्दव आटोळे,ग्रा.पं.सदस्य तांबोळा यांचा आरोप.
लोणार प्रतिनिधि

लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत तांबोळा भ्रष्टाचाराबाबत दोन तक्रार व 3 स्मरण पत्र देवुन सुध्दा अदयाप कार्यवाही न झाल्याने पंचायत समिती संबंधीतास पाठीशी घालत असल्याचा संशय होत असल्याबाबत नमुद विषयाची स्मरण पत्र उध्दव माधवराव आटोळे यांनी आज दिनांक 21 सप्टेबंर 2022 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती,लोणार यांना दिले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, उध्दव आटोळे यांनी ग्रामपंचायत भ्रष्टाचारा बाबतची तक्रार दिनांक 30/07/2022,दिनांक 12/08/2022 रोजी पुराव्यानिशी दिली असता, तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीच कार्यवाही गट विकास अधिकारी यांनी केली नसल्याने कार्यवाही करणे बाबत एकुण दोन व आज दिलेले.
असे तीन स्मरण पत्र दिले असतांना सुध्दा कार्यवाही होत नाही तसेच विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. तक्रार करून साधे ग्रामपंचायत सचिव यांना पंचायत समितीने काढलेले पत्र सुध्दा प्राप्त न झाल्यामुळे तक्रारी नेमक्या कचरा पेटीत टाकल्या गेल्या की काय ? पंचायत समिती कार्यालयाकडे तक्रारी देवुन सुध्दा त्यावर कार्यवाही होत नसेल तर यावरून संबंधीत ग्रामसेवक व पंचायत समिती अधिकारी यांचे काहीतरी संगणमत तर नाही ना ? जर नागरीकांनी तक्रारी करून सुध्दा तक्रारीवर कार्यवाही होत नसेल तर तक्रारी देवुन फायदा काय ? यावरून ग्रामसेवक यांना गट विकास अधिकारी यांचा धाक नसल्याने संबंधीत ग्रामसेवक बिनधास्त पणे भ्रष्टाचार करीत असुन संबंधीतांना गट विकास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा संशय तसेच आरोप तक्रारीमध्ये उध्दव आटोळे यांनी केला आहे. वारंवार तक्रारी देवुन तक्रारीवर कार्यवाही होत नसल्याने पंचायत समिती मधील गेल्या सहा महीन्याच्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाही बाबत चौकशी करणेसाठी तसेच पंचायत समिती कार्यालयाने तक्रारीचे अर्ज स्वीकारू नये कारण कार्यवाही करायची नाही तर मंग तक्रारी घेवुन नागरीकांना तक्रारीवर काय कार्यवाही झाली,यासाठी वणवण का फिरावे.या समस्येचा स्वत: अनुभव आल्याने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे 7 दिवसाचे आत आज दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यास तक्रार करणार असल्याचे उध्दव आटोळे यांनी सांगीतले आहे.आता तरी पंचायत समिती कार्यालय तक्रारी निकाली काढणार की असेच व्यथीत होवुन नागरीकांना वरीष्ठ कार्यालयाचा दरवाजा ठोकावा लागणार याकडे तालुका वासीयांचे लक्ष वेधले आहे.ऐवढे मात्र खरे…