
बाभुळगाव -येवला पाटोदा रोड वर नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात आहे शाळा कॉलेज ला पायी जाणारे विद्यार्थी व परिसरातील नागरिक शेतकरी ,नोकरदार,लहान मूल यांची खूप वर्दळ आहे मोठ्या प्रमाणात रस्त्याने वर्दळ असल्याने त्यातच बिबट्या ने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन दहशतिचे वातावरण तयार झाले आहे.
या परिसरात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आजू बाजूला काही वस्त्यावरील नागरिक आहेत.
तसेच आजूबाजूला घरें, सैनिक कॉलनी,म्हसोबा नगर आहे.
यांतच बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतीमध्ये काम करण्यासाठी जायला मजूर वर्ग घाबरत आहे.म्हसोबा नगर येथे नाला आहे.
येथील कॉलनीतील नागरिक पिंजरा लावण्याची मागणी करत आहे.
वनविभाग यांनी लवकरात लवकर याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंजरा लावण्यात यावा. असे आवाहन नागरिक करत आहेत.