जिल्हा परिषद प्राथमिक शाळा:- शिंदे वस्ती [पालखेड] ता:निफाड या शाळेत पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धांचे आयोजन…
मनोहर देसले निफाड

शालेय पोषण आहार योजना अंतर्गत संपूर्ण राज्यातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार सप्ताह सुरु असल्याने संपूर्ण राज्यात या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचाच एक उपक्रम म्हणून पंचायत समिती निफाड अंतर्गत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.केशव तुंगार साहेब यांनी आपल्या जि.प.शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचा संकल्प केला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळा पोषण आहार सप्ताह कार्यक्रम घेत असून विविध स्पर्धांचे नियोजन केले असून त्याचाच एक उपक्रम शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गायकवाड साहेब व केंद्रप्रमुख श्री.सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील मुख्याध्यापक श्री.नवनाथ गांगुर्डे व उपशिक्षिका श्रीमती. सुजाता विश्वासराव पाटील यांनी इ.३री व ४ थीच्या विद्यार्थ्यांकडून विविध चित्र काढून घेतली व स्पर्धेत सहभाग नोंदवला सदर उपक्रमाचे कौतुक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.विजय शिंदे व सदस्यांनी केले .