
लासलगाव ग्रामपंचायत आरोग्य विभागाकडून श्री महावीर विद्यालयाजवळ कॉलेज रोड वर रस्त्याच्या मधोमध ग्रामपंचायत कचरा भरलेली ट्रॉली लावली असल्यामुळे तसेच रस्त्याच्या दुतर्फा कित्येक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे तसेच मोठ्या प्रमाणात डुकरांचे वास्तव्य तयार झाले आहे त्यामुळे शाळेत महाविद्यालयात जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तरी ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी कचऱ्याचा बंदोबस्त करून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र टरले नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे