
शहरपरिसरात रविवारी सायंकाळी तूफान वारा आणि विजेच्या कडकडात पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाड शहराचा बाजार रविवारी भरतो. अचानक आलेल्या पावसामुळे येथे भरणाऱ्या आठवडे बाजारत व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी ग्रामीण भागात बाजरी कापनी आणि कांदा लागवड सुरु असल्याने शेतकरी व शेतमजूरांची मोठी धावपळ उडाली.अवघ्या मिनीटात रस्ते जलमय झाले तर शहरात सर्वत्र पानीच,पानी साचले होते.त्यामुळे आज आठवडे बाजार असल्याने बाजारात आलेल्यांची एकच धावपळ उडाली होती. तब्बल ९ तास सुरू असलेल्या पावामुळे शहरातील रामगुळणा व पांझण नद्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. रविवारी ७१ मिलीमिटर पावसाची नोंद झाली यंदाच्या पावसाळ्यातील उच्चांक म्हणावे लागेल.
मुसळधार झालेल्या या पावसाने रस्त्यावर झालेल्या खड्यात पाणी साचल्याने रस्त्यात खड्डा की,खड्यात रस्ता हे समजत नसल्याने वाहनधारक आणि नागरिकांना चालतांना तारेवरची कसरत करावी लागत होती.गेल्या तीन-चार दिवसांपासून मध्यम वसंतदार पाऊस सुरूच होते.आज रविवारी मात्र दिवसभर सुर्यदर्शनही झाले नाही. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.त्यामुळे अवघ्या काही मिनिटात सगळीकडे पाणीच पानी झाले होते.वारा आणि पावसाचा वेग इतका प्रचंड होता की,अवघ्या काही वेळांतच शहराच्या रस्त्यांवरून पाणी वाहू लागले होते. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळत होते.