उलवे येथील अनिरुद्धकृपा सोसायटीत अतिक्रमण जोमात सिडको प्रशासन मात्र कोमात….
प्रतिनिधी :सुबोध सावंत

नवी मुंबई :उलवे सेक्टर 20 येथील अनिरुद्धकृपा हाऊसिंग सोसायटी या चार मजली इमारतिच्या चौथ्या मजल्यावरील सदनिका नंबर 401 व 402 या सदनिकांच्या बाल्कनी साठी दिलेल्या जागेवर रूम मालकांनी अतिक्रमण केलं आहे त्यामुळे या रूमच्या खालील रूम मध्ये पावसाळ्यात लिकेज होते तसेच वरून टाकण्यात येणारा कचरा हा खलील रूमच्या बाल्कनीत पडून खाली राहणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो ही बाब खाली राहणाऱ्या रूममधील लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सुबोध सावंत याना सांगून निदर्शनास आणून दिली असता त्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून सिडको प्रशासनास दिनांक 20/08/2021 रोजी पत्र देऊन करवाही करण्याची मागणी केली होती परंतु सिडको अतिक्रमण विभागाने करवाही न करता उडवा उडवीची उत्तरे देत अर्ज निकाली काढला. सावंत यांनी याच अर्जाच्या अनुषंघाने दिनांक 23/11/2021 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्ज करून माहिती मागवली असता प्रशासनाने कोरोना या आजाराचे कारण सांगितले. कोरोना काळ संपुष्टात आल्यावर दिनांक 19/01/2022 रोजी प्रथम अपिलीय अधिकारी यांना प्रथम अपील अर्ज केला असता त्यावर काहीच सूनवाई झाली नाही यावरून सिडको अतिक्रमण विभागाचे वसाहत अधिकारी श्री टकले व त्या अतिक्रमण केलेल्या सदनिका धारक मालकांचे काही साठे लोठे आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील पाठपुरावा करण्यासाठी दिनांक 01/04/2022 रोजी माहिती आयुक्त कोकण विभाग खंडपीठ यांना दुसरा अपील करून दाद मागितली आहे. इतके प्रयत्न करून सुद्धा सिडको अतिक्रमण प्रशासनाची कुंभकर्ण झोप काही जात नाही. अखेर ते अतिक्रमण कधी निष्कासित या सोसायटीतील बाकीच्या रूम धारकांना न्याय कधी मिळेल….