वाहनात गुदमरून मेलेल्या २३ गुरांना तस्करांनी सुकी नदीत फेकल्याची शंका? समाजसेवक श्रीकांत सरोदे चिनावल सदरील सर्व २२ मृत गुरांची ग्रामस्थांनी केली अंत्यविधी
सावदा प्रतिनिधी मोहसिन शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर ते सावदा दरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुल व परिसरात आज दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी शेतात कामानिमित्त जाणाऱ्या मजूरांना अतिशय दुर्गंधी येत असताना याबाबत त्यांनी पाहणी केली असता त्यांना नदीच्या पुलाखाली पाण्यात मृत्यू अवस्थेत काही गुरे दिसून आले.यानंतर सदरचा प्रकार वाऱ्यासारखा पसरल्याने एकच खळबळ उडाली.तरी घटनास्थळी सर्वप्रथम चिनावल येथील नागरिकांची मोठी गर्दी झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला असताना अनेक गुरांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात प्रशासन सतर्कतेचा इशारा देत असतांना आज सकाळी सुकी नदीच्या पात्रात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत गुरे आढळून येणे चिंताजनक असून याबाबत सखोल चौकशी होऊन अशा गैर कृत्य करणाऱ्यांना तात्काळ शोधून अटक होणे फार गरजेचे आहे.
तसेच आज सकाळीच एखाद्या वाहनातून गुदमरून मेलेल्या २३ गुरांना पुलावरून थेट अतिशय निर्दयीपणे सदरील नदीत फेकून दिल्या असावे असे प्रथमदर्शनी पाहता पात्रात दिसून येत आहे.दरम्यान हे गुरे लंपीमुळे मृत झाले की,अन्य कारणाने? याबाबत घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना विचारले असता सदर गुरे निरोगी व साधारणतः दोन ते तीन वय वर्षाचे तरुण होते.त्यांना लंपी किंवा निमोनिया सारखे कोणतेही आजार आम्ही तपासणी केल्याच्या दरम्यान आढळून आले नसून जवळपास १५ ते १८ तासांपासून सदरील गुरे नदिच्या पाण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यातील एखाद्या वाहनात गुरे गुदमरून मेली असल्याने त्यांना नदीपात्रात टाकले असावे का? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे.याचे कारण असे की,यातील काही गुरांच्या गळ्याला दोराचा फास लागल्याचे दिसून येत आहे.तसेच यावेळी सदरील गुरे वाहनात गुदमरून मेल्यानंतर त्यांना गोवंश तस्करांनी फेकल्याची शंका समाजसेवक श्रीकांत सरोदे यांनी व्यक्त केली
दरम्यान सदरील प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी चिनावल येथील सामाजसेवक श्रीकांत सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला माहिती आली असता घटनास्थळी निंभोरा व सावदा येथील पोलिसांनी चिनावल येथील गावकऱ्यांच्या मदतीने थेट पुलापासून एक ते दीड किलोमीटर अंतर वाहून गेलेल्या एकूण २३ मृत गुरांना दोरीच्या साह्याने नदीच्या बाहेर काठावर आणून त्यांना खिरोदा येथील संतोष इंगळे यांच्या जेसीबीद्वारे खड्डा करून शासकीय विधीवत रीत्या पुरवले.या कामी चिनावल येथील समाजसेवक श्रीकांत सरोदे,योगेश बोरोले,पोलीस पाटील निलेश नेमाडे,हितेश भंगाळे,योगेश पाटील,निलेश गारसे,गजू साळुंखे,किरण महाजन,वैभव नेमाडे इत्यादी ग्रामस्थां सहीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.लहासे सावदा पशुवैद्यकीय अधिकारी राजपूत व यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली आहे.सदरील घटनेबाबत पोलीस पाटील निलेश नेमाडे यांनी फिर्याद दिल्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुरनं.१८३/२०२२ अन्वे महाराष्ट्र पशु क्रूरता अधि.व पर्यावरणला बांधा निर्माण केल्या बाबतच्या कलम २६९,२७० व भांदवीचे कलम ४२९ अन्वये अज्ञात व्यक्तिवृत्त गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास एपीआय देवीदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.विनोद पाटील हे करीत आहे.