लासलगाव येथील क्रांती मित्र मंडळाने माझी वसुंधरा उपक्रम साजरा करून एक आदर्श स्थापित केला…..
संपादक राहुल वैराळ

श्रीराम नगर लासलगाव येथील क्रांती मित्र मंडळाने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन एक गावात आदर्श निर्माण केला आहे. कुठेही मोठेपणा न करत वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. जसे मंडळ परिसर स्वच्छता अभियान, लहान मुलांचे विविध खेळ (कबड्डी, खो-खो, मामाचे पत्र इत्यादी.), डॉ. दत्ता मोटेगावकर यांचे व्याख्यान विषय – १) लोकमान्य टिळक व बदलत्या काळानुसार गणेशोस्तव २) पाळीव व भटक्या जनावर यांच्यामुळे होणाऱ्या रेबीज व लम्पी आजार , पारंपारिक खेळ लिंबू चमचा, संगीत खुर्ची इ.,डॉ. मनोज ठोके यांचे व्याख्यान विषय – महिला स्वास्थ्य व लहान मुलांचे आरोग्य, पारंपारिक खेळ लिंबू चमचा, संगीत खुर्ची इ.डॉ. मनोज ठोके यांचे व्याख्यान विषय – महिला स्वास्थ्य व लहान मुलांचे आरोग्य, डॉ. शरद कातकाडे यांचे व्याख्यान विषय – साथीचे आजार (डेंगू , स्वाइन फ्लू, चिकनगुण्या), गणेश भक्तांसाठी पारंपारिक वेशभूषा व लहान मुलांसाठी देशभक्तीपर गीत गायन,भव्य कोविड लसीकरण, श्री योगेश गलांडे यांचे व्याख्यान विषय- शासकीय योजना, गायत्री पाठ, श्री योगशिक्षक गणेश वडनेरे यांचे व्याख्यान विषय – योग व आरोग्य, निंबंध स्पर्धा (६ वी ते १० वी)विषय – पर्यावरण संतुलन व क्रांतिकारकाचे चारीत्र्ये, चित्रकला स्पर्धा (१ ली ते ५ वी)विषय – फळांचे चित्रे, प्राण्यांचे चित्रे व पर्यावरण आधारित चित्रे, पोस्ट ऑफिस यांची योजना (विमा काढण्यात येतील), भजन संध्या, रांगोळी स्पर्धा विषय – पर्यावरण , भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोस्तव ,पंचायत समिती अधिकारी यांचे व्याख्यान विषय – माझी वसुंधरा व कापडी ३०० पिशव्यांचे वाटप मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
दर वर्षी क्रांती मित्र मंडळ अश्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करत असते. मंडळाने गणेश मूर्ती स्थापन केलेल्या परिसरात महाराष्ट्र सरकार चा उपक्रम माझी वसुंधरा अंतर्गत पाच तत्वन्ना आनुसरून घरावरील पाण्याचे संकलन, वृक्ष तोड थांबवा, घरगुती घन कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, प्रदूषण मुक्ता भारत आदी माहिती फलक लावून समाजात जनजागृती केली आहे…