राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सभासद नोंदणी वर भर देणार-जितू भाऊ बागुल नाशिक युवा जिल्हाध्यक्ष,.
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक:-राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची बैठक आज दि.१७ सप्टेंबर 2022 रोजी नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे
राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात जोमाने सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने पक्षाचे काम सुरू असून सदस्य नोंदणी ला वेग द्यावा असे मार्गदर्शन अण्णासाहेब कटारे यांनी केले.
संपूर्ण नाशिक शहर/तालुका/जिल्ह्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सभासद वाढविणार व सभासद नोंदणी वर भर देणार असे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल यांनी बोलतांना सांगितले.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दररोज असंख्य कार्यकर्ते प्रवेश करीत असून त्या अनुषंगाने
दि.१८ सप्टेंबर 2022 रोजी येवला शासकीय विश्रामगृह येथे भव्य प्रवेश सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे.
नाशिक शहर/जिल्हा बैठकीस
राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जी अकोलकर सर,युवा नेतृत्व बिपीन अण्णासाहेब कटारे,महाराष्ट्र महिला आघाडी प्रभारी मीना ताई भालेराव,दिलीप जी प्रधान,अनंत बस्ते,जगताप साहेब,दिलीप जमधाडे,राजेंद्र जी भालेराव,प्रशांत कटारे,प्रतीक सोनटक्के(नाशिकरोड उपाध्यक्ष),पंढरीनाथ आव्हाड(जिल्हा उपाध्यक्ष),रेश्माताई बच्छाव(नाशिक शहराध्यक्षा महिला आघाडी),मनोहर दोंदे(जिल्हा नेते),धर्मराज पाईकराव(सातपूर उपाध्यक्ष),संजय तुपसौंदर(जिल्हा नेते),प्रशांत शिंदे(शहर संघटक)
आदी उपस्थित होते