राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी ; वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेल्याचा निषेध…
प्रतिनिधी मनमाड

वेदांत फॉक्सकॉन प्रकरण आता चांगलेच राजकीय वळण घेत आहे.फडणवीस – शिंदे सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प गुजराथ मध्ये गेल्याचा आरोप करत शहरातील शिवसैनिकांनी निदर्शने करून येथील तलाठी सागर जोपळे यांना निवेदन दिले.यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शिंदे सरकारचा निषेध केला.महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारी रोजगाराची संधी हिरावली गेली असे सांगत पळविण्यात आलेले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्र राज्यात आणावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात होण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु झाल्या होत्या.पण महाविकास आघाडी सरकार जाऊन आता राज्यात भाजपा सरकार सत्तेत आले आहे. त्यानंतर राजकीय वातावरण आधीच ढवळून निघालेले असताना आता हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी हेच विद्यमान सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.यामुळे लाखो रोजगार निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत असतांना देखील सध्याचे खोके सरकार गप्प आहे.महाराष्ट्र राज्यात पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व राज्याचा महसूल वाढावा या उद्देशाने राज्यात प्रस्तावित असलेला १.४५ लाख कोटी रुपयांचा गुंतवणुकीचा व राज्यातील एक लाखापेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळवून देणारा वेदांत फ़ॉक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यात पळवुन लावणाऱ्या ई.डी.सरकारचा जाहिर निषेध यावेळी करण्यात आला.यापुढे महाराष्ट्र राज्यातील जनतेवर होणारा अन्याय आम्ही सहन करनार नाही.याची राज्य सरकारने दक्षता घ्यावी.या अशयाचे एक निवेदन यावेळी तलाठी सागर जोपळे यांना देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रविण नाईक,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,संतोष बळीद,संजय कटारिया,कैलास गवळी,शैलेश सोनवणे,राजेंद्र आहेर,खालीद शेख, संतोष जगताप,सनी फसाटे,कयाम सैय्यद,विनय आहेर,योगेश शर्मा,संतोष साळुंके,रवी इप्पर,प्रविण धाकराव,मायकल फर्नांडिस,ज्ञानेश्वर नागापुरे,स्वराज देशमुख,पंडीत सानप,माधव शेलार,ईरफान शेख,महीला आघाडीच्या रेणुका जयस्वाल,लीला राऊत,किरण शिंदे अदिसह शिवसेना, युवासेना,महीला आघाडीचे पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.