ताज्या घडामोडी
निफाड येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती मंदाकिनी भागवत यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

आपली आपुलकी बहुउद्देशिय संस्था नाशिक यांचेतर्फे शैक्षणिक , सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत शिक्षक पुरस्कार जि.प .प्राथमिक शाळा बोकडदरे, ता.निफाड येथील शिक्षिका श्रीमती मंदाकिनी बालाजी भागवत यांना मिळाला.
आपली आपुलकी बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. खंडेराव डावरे ,उपाध्यक्ष श्री जयवंत राऊत ,सचिव श्री.शांताराम गायकवाड, सहसचिव श्री रामदास शिंदे , श्री दादासाहेब गायकवाड,श्री माचरेकर सर आणि सर्व सदस्य यांच्यावतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री तुंगार साहेब, विस्तार आधिकारी श्री गायकवाड साहेब, श्री .बोरसे साहेब , केंद्र प्रमुख श्री उगले सर आणि जि.प शाळा बोकडदरे तसेच विंचूर केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.