नाशिक,देवळाली मतदार संघ,माडसांगवी “दारूबंदी अभियान” डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी घेतली आक्रमक भुमिका..!! महिलांसमवेत थेट नाशिक जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांना दिले निवेदन.
नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक-नाशिक रोड देवळाली मतदार संघातील,माडसांगवी येथील सरपंच सौ.मनिषाताई संतोष सोळसे,व उपसरपंच सौ.सुनंदाताई पेखळे व समस्त माडसांगवी येथील महिलांतर्फे देवळाली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे यांच्या कन्या डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या फाऊंडेशनला माडसांगवी येथील दारुबंदी या विषया अंतर्गत निवेदन देण्यात आले,त्याची तात्काळ दखल घेऊन डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे ह्या माडसांगवी येथे ग्रामपंचायत मध्ये दाखल झाल्या व माडसांगवी येथील “दारुबंदी व्हावी” या विषयावर घमासान आवाज उठवला,यावेळी रोकडे व गोंदकर जे यापूर्वी अवैधरित्या दारु विक्री करत होते त्यांनीच आज पासून आम्ही दारु विकणार नाही व दारुबंदी मध्ये स्वपुढाकार घेऊ असे डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे व महिलांच्यावतीने रोकडे व गोंदकर यांच्याकडून वदवून घेण्यात आले.
समस्त माडसांगवी गाव दारूच्या विळख्यात सापडले आहे,नवयुवक देशोधडीला लागले आहेत,येथील लोकांचे संसार यामुळे उध्द्वस्त झाले आहेत,अवैधरित्या अनेकजण येथे सर्रास दारू विक्री करतात,स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार यांनी कधीच येथे भेट देऊन महिलांच्या ह्या समस्या जाणून घेतल्या नाहीत,यामुळे स्थानिक आमदार तसेच प्रशासनाचा पुन्हा एकदा ढिम्म ढिसाळ कारभार समोर आला,आणि म्हणूनच येथील महिला, सरपंच व उपसरपंच, डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी पुढाकार घेऊन अग्रेसर भूमिका घेत तसे निवेदन,नाशिक जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांना दिले त्या अनुषंगाने माडसांगवी येथे तात्काळ दारुबंदी करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले,यावेळी मांडसांगवी पंचक्रोशीतील सर्व महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.