जयसिंगपूर मध्ये घरकुलच्या मागणीसाठी महिलांचा मोर्चा नगरपालिकेला निवेदन
प्रतिनिधी संतोष कोठावळे

जयसिंगपूर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार व माहिती अधिकारी विभाग तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपरिषदे समोर महिलांचा मोर्चा काढण्यात आला . हक्काची घरे मिळालीच पाहिजेत याकरिता जयसिंगपूर या ठिकाणी झोपडपट्टी विभागातील महिलांनी मोर्चा काढून नगरपरिषद येतील मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुख्याधिकारी यांनी असे मत व्यक्त केली की ज्या आपल्या मागण्या आहे ते पुढे आम्ही शासन दरबारी मांडतो या मोर्चाची सुरुवात राजू गांधीनगर इथून सुरुवात झाली यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक व महिला वर्ग आपल्या मागण्या घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे
१. जयसिंगपूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेली झोपडपट्टी चे नियमितीकरण होऊन त्यांना हक्काची पक्की घरे बांधून मिळावी.
२.अतिक्रमण विभागातील झोपडपट्टीवजा घरे घरकुल योजनेअंतर्गत पक्की बांधून मिळावीत
३. जयसिंगपूरमध्ये वर्षांनुवर्षे भाडेकरू म्हणून राहणार्या कुटुंबांना म्हाडासारख्या प्रकल्पातून स्वतःची हक्काची घरे बांधून द्यावीत.
४. लोकप्रतिनिधींना प्रलंबित ठेवून सर्वसामान्य गरजू ,निराधार ,आश्रित लोकांना अतिक्रमण विभागातील घरकुल योजनेचा प्रथमत: लाभ मिळावा.
वरीलप्रमाणे प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सतीश मोटे, यांनी असे वक्तव्य केले आहे की आमचा लवकरात लवकर जर का विचार केला नाही तर याही पेक्षा पुढे मोठे आंदोलन केले जाईल ते आंदोलन आम्ही तहसीलदार कार्यालयावरती करू असे मत व्यक्त केले आहे यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे रवींद्र कांबळे, राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी बंजारा प्रकोष्ठच्या श्रीकांत शिंघाई ,पत्रकार विजय धंगेकर,राजू मुजावर ,अजय हराळे,रोहित कांबळे, राहुल घोलप, संतोष कोठावळे व घरकुल योजनेपासून वंचित महिलावर्ग उपस्थित होता.