
नाशिक-निफाड तालुक्यातील खेरवाडी नारायण गाव येथे सन २००७ च्या शासन निर्णयानुसार येथे स्थापन झालेली तंटामुक्त समिती कामकाजास असमर्थ असल्याने नुकतीच झालेल्या ग्रामसभेत नव्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनरस्थापना करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून वादविवाद मिटवण्यासाठी समुपदेशन करणारे व व्यसनमुक्ती कार्यकर्ते दिलीप रंगनाथ संगमनेरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सदस्य समितीत सरपंच सौ. अश्विनी जाधव, उपसरपंच उमेश पगारे तसेच विशेष प्रतिनिधी रत्नाताई संगमनेरे, शिक्षक प्रतिनिधी अशोक कापसे, वकील प्रतिनिधी सौ.तेजल पवार ,ग्रामविकास अधिकारी श्रीपाद दहिफळे, तलाठी ऋतुजाताई जाधव ,डॉक्टर विलास जाधव, वीज वितरण चे योगेश हारोड ,बचत गट प्रतिनिधी भारती संगमनेरे, विठोबा बुरके, किसन लांडगे, संदीप जाधव, कैलास संगमनेरे, सुभाष बेंडकुळे, विकास आवारे, दशरथ संगमनेरे ,काशिनाथ शंकर संगमनेरे, मधुकर आवारे ,सुनील उत्तम आवारे ,काशेश्वर संगमनेरे, पुंजाराम आवारे, बाजीराव उगले, संजय आवारे आदींची निवड करण्यात आली. गावातील व्यक्ती कुटुंब किंवा दोन गटातील तंटे विकोपास न जाता स्थानिक पातळीवर गावातच सामंजस्याने निपक्षपातीपणे वाद मिटून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. यावेळी सायखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी.आय.कादरी यांनी समितीच्या सर्व सदस्यांना फौजदारी,दिवाणी तंटे व इतर गुन्हे यांचे विश्लेषण करून पोलीस स्टेशन व तंटामुक्ती समिती यांच्यातील आंतरिक सुसंवादाने मिटणारे तंटे याविषयी सखोल मार्गदर्शन करून नवनिर्वाचित समिती अध्यक्ष दिलीप संगमनेरे व उपस्थित सर्व सदस्यांचा यथोचित सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.