कोल्हापूर हातकणंगले हायवेवर पडलेल्या खड्ड्च्यामुळे अवतरले यमराज
हातकणंगले तालुका प्रतिनिधी

कोल्हापूर-सांगली-सोलापूर जिल्ह्यातील मोठी वाहतूक असणारा कोल्हापूर-हातकणंगले हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, अपघातामध्ये अनेक जणांनी आपले जीव गमावलेले आहेत काहींनी कायमचे अपंगत्व आले आहे या सर्व गोष्टींचा विचार करता खड्डे लवकरात लवकर मुजवावे त्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने कोल्हापूर ते हातकणंगले रस्त्यावरील अतिग्रे येतील सागरिका हॉटेल समोर हायवे रस्त्यामध्ये यमराज बसवून युवा महाराष्ट्र सेनेने निदर्शने केली व जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर आदेश देऊन खड्डे मजवून घ्यावेत व नागरिकांचे जीव वाचवावेत अशी विनंती केली व या गोष्टीचा निषेध व्यक्त केला पंधरा दिवसाच्या आत या हवेचे खड्डे पडलेले भरून घेतली पाहिजे व रस्त्याचे काम केले पाहिजे अन्यथा मोठे जन आंदोलन उभा करू असेही वक्तव्य आंदोलकांच्याकडून व्यक्त करण्यात आले व शासनाला इशारा देण्यात आलेला आहे मुळात कोल्हापूर हा सुपीक जिल्हा असून या जिल्ह्यात या प्रकारे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आंदोलना वेळी प्रतिकात्मक यमराज बनलेले अभिनेते बसवराज टकळगी, युवा महाराष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले, तोसिफ इनामदार, अशोक रानभरे,सदाशिव अभी बंडिगणी, मुद्दसर जमादार,राजु दंडि, रोहित भोसले,योगेश गवळी, सागर लिपारे, सचिन पाटील, राहुल लोकरे, सचिन बेलेकर,सतिश कवडे, आनंद नाईक, कृष्णा जावीर, रोहित कल्याणकर, अभी घोडगिरे, रविंद्र कवडे…