उर्दू घर साठी अस्थाई समिती गठीत – जिल्हाधिकारी जळगाव सोबत सकारात्मक चर्चा
प्रतिनिधी शाहिद खान

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे महाराष्ट्रात १२ ठिकाणी उर्दू घराला मान्यता देण्यात आली असून त्यात जळगाव चा सुद्धा समावेश आहे
तसा शासन निर्णय ६ मे २२ रोजी जिल्हाअधिकारी यांना प्राप्त झाला असला तरी उर्दू घर बाबत शासनाकडे तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वया अभावी या कामी पाहिजे तशी प्रगती दिसून येत नसल्याने जळगाव शहरातील उर्दू – मराठी क्षेत्रातील कवी, लेखक,पत्रकार,तसेच अल्पसंख्यांक विभागातील राजकीय क्षेत्रातील प्रमुख, व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन उर्दू घर अस्थायी समितीची स्थापन केली आहे.
समीतीचे कार्य
सदर समिती मार्फत मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी विचारवंत इत्यादीमध्ये सर्जनशील विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी व उर्दू भाषेचा वाड्मयीन विकास व्हावा व उर्दू भाषेच्या समृद्धीसाठी उर्दू घराच्या रूपाने एक ठिकाण असावे या उद्देशाने शासनाने मान्य केलेल्या जळगाव शहरात उर्दू घर उभारण्यासाठी सदर अस्थायी समिती कार्यरत राहील व वेळो वेळी शासन व उर्दू – मराठी साहित्यिका मध्ये समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे.
समितीची पहिली बैठक जिल्हाअधिकारी सोबत उत्साहात
उर्दू घर समितीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना उर्दू घर जागेचा प्रस्ताव सादर केला.
सदर प्रस्तावा बाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक पणे या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेऊ व जळगावात लवकरात लवकर उर्दू घराची स्थापना करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे या समितीला आश्वासित केले.
उर्दू घर अस्थायी समिती
समिती मध्ये कोणीही पदाधिकारी नसून सर्व सभासद आहे
फारूक शेख( समनव्यक), उर्दू पत्रकार व लेखक सईद पटेल व अकील खान,उर्दू कवी कासिम उमर,उर्दू शिक्षण संस्था तर्फे नदीम काझी,मानव अधिकार चे अनवर खान,अल्पसंख्यांक समाजातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले भाजपचे शब्बीर सय्यद,काँग्रेसचे मुक्तदीर देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे मजहर पठाण, समाजवादी पार्टीचे रईस बागवान,एमआयएम चे अकरम देशमुख व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अयाज मोहसीन यांचा यात समावेश आहे।
समितीत आवश्यकते अनुसार वाढ करण्यात येणार आहे.
फोटो
१) मा जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांचेशी चर्चा करताना समिती सदस्य
२) जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांना उर्दू घर जागेचा प्रस्ताव सादर करताना समिती सदस्य