ताज्या घडामोडी

तोंडापूर अत्याचार प्रकरणी लढ्याला यश -आरोपी निष्पन्न आरोपीस ३ दिवसाची पोलीस कोठडी जामनेर न्यायालयात फारूक शेख,मजहर खान व अहेमद सर त्रयस्थ अर्जदार म्हणून उपस्थित

प्रतिनिधी शाहिद खान

तोंडापूर अत्याचार प्रकरणी आरोपीस अटक करून जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश बी एम काळे यांनी त्यास ३ दिवसाची पोलीस कोठडी दिली. सरकार तर्फे अडव्होकेट सौ भट यांनी तर त्रयस्थ अर्जदार फारूक शेख,मजहर पठाण व अहेमद सर यांचे तर्फे अडव्होकेट रफिक शेख यांनी काम पाहिले.आय.ओ म्हणून पो उप निरीक्षक अमोल गर्जे यांनी पैरवी केली.

तोंडापूर येथील एका मुस्लिम आदिवासी अल्पवयीन महिले सोबत अत्याचार करून तिला मारहाण करण्यात आली होती ती गंभीर स्वरूपाने जखमी होऊन बेशुद्ध असल्याने तिच्यावर रानडुकराने हल्ला केलेला आहे अशा आशयाची वृत्त प्रसारित करण्यात आले होते परंतु सदर हल्ला हा रानडुकराने केला नसून मानव डुकराने लैंगिक शोषणा साठी हल्ला केलेला असल्याने त्यावर कारवाई करण्यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सामाजिक विभागाच्या श्रीमती प्रतिभा शिरसाठ, कुल जमातीचे अध्यक्ष सैयद चाँद व ताहेर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांचे अध्यक्ष मजहर खान,एमआयएम चे जिल्हाध्यक्ष अहमद सर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, ईदगाह ट्रस्ट चे अनिस शाह, जिल्हा काँग्रेसचे नदीम काझी व अमजद पठाण, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान व जावेद खान, शिवसेनेचे महानगर अध्यक्ष जाकीर पठाण, महिला अत्याचार समिती च्या सौ नसरून सैय्यद,आदिवासी तड़वी महिला मंडळाच्या रफिया बाबू तड़वी,छाया तड़वी, नासिर तडवी, बाबू तडवी व त्यांच्या सहकारी यांनी सलग पंधरा दिवस लढा दिल्यानंतर त्यांना न्याय मिळालेला आहे.

२ सेप्टेंबर ची घटना- गुन्हा ७ सेप्टेंबर रोजी

२ सप्टेंबरला तोंडापूर येथे घटना घडली पीडेतेला जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे ऍडमिट केले तेथील डॉक्टरांनी त्यांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले गोदावरी येथील डॉक्टरांनी प्राथमिक प्रथमोपचार करून सदर पिडीतेला हायर सेंटरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला आणि ३ सप्टेंबरला रात्री सदर पीडितेला घाटी रुग्णालय, औरंगाबाद येथे ऍडमिट करण्यात आले.
४ सप्टेंबरला नातेवाईकांनी पहुर पोलीस स्टेशनला तक्रार केली परंतु दवाखान्यातील प्राप्त डॉक्टर व नशिराबाद पोलिसांच्या पत्रावरून रानडुकराने हल्ला केलेला आहे म्हणून नोंद केली.

सदर प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे ७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे मुस्लिम मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारुख शेख यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांची भेट घेऊ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली असता एस पी साहेबांनी पहुर पोलिसांना सूचित केल्यावर त्यानुसार ७ सप्टेंबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३२/२२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला.

९ सप्टेंबर रोजी जळगाव मुस्लिम शिष्टमंडळा सह भुसावळ मुस्लिम मंच ने पहूर पोलीस स्टेशनला व तोंडापूर येथे जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली असता त्यात फार मोठी तफावत आढळून आली म्हणून पोलीस निरीक्षक प्रशांत इंगळे यांची भेट घेऊन त्यांना या गुन्ह्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आपण जी कलमे लावली ती अत्यंत नॉर्मल मारामारीची असून यात अत्याचाराचे कलम ३७६, अल्पवयीन मुलगी असल्याने पोस्कोचे कलम, आदिवासी असल्याने ॲट्रॉसिटी चे कलम, गर्भाचे नुकसान झाले असल्याने ३१२,३१३ तसेच गंभीर दुखापत असल्याने ३०७ कलम लावून आरोपींना त्वरित अटक करा अशी लेखी मागणी केली.

१३ सप्टेंबर पर्यंत पहुर पोलीस स्टेशन मार्फत काही कारवाई न झाल्याने जळगाव येथे जिल्हा दंडाधिकारी अभिजीत राऊत यांची शिष्टमंडळाने भेट घेतली भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत विशद केली त्यांनी त्वरित पोलीस अधीक्षक जळगाव यांना भ्रमणध्वनी व्हाट्सएपच्या द्वारे लिखित स्वरूपात कारवाईचे आदेश दिले.
१५ सप्टेंबर रोजी दुपारी विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार जळगावी कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता त्यांना सुध्दा या घटनेबाबत माहिती देऊन निवेदन दिले होते.

१६ सप्टेंबर ला आरोपी ला अटक व कलमात वाढ

पहुर पोलीसांनी तोंडापूर येथीलच शकील उर्फ अजय सांडू तडवी याला अटक करून गुन्ह्यात भादवी ३७६ व ३९४ या अतिरिक्त कलमांची वाढ करण्यात आली असून तपासात अजून कलमा मध्ये वाढ होऊ शकते असे तपासी पोलीस उप निरीक्षक अमोल गर्जे यांनी माहिती दिली.

फ़ॉलोअप व दबाव तंत्राने प्रकरण उघड़किस – फारूक शेख

तोंडापूर पिडितेला न्याय मिळवण्यासाठी जळगाव शहरातील व जिल्ह्यातील विविध संघटनांनी निवेदन दिली परंतु फारुक शेख व त्यांच्या सह कार्यरत असलेल्या शिष्टमंडळाने सतत प्रशासनावर उपलब्ध कागदपत्र व पुराव्यानुसार प्रकरण उघडकिस आणण्यासाठी दबाव तंत्र व फॉलोअप केल्याने आरोपी निष्पन्न होऊन प्रकरण रानडुकराचे नसून माणसाचे आहे हे सिद्ध झाले.

अल्लाह सह अधिकारी व सहकाऱ्यांचे आभार

सदर प्रकरणी सर्वप्रथम अल्लाहचे आभार मानून त्यांनी औरंगाबाद येथील एडवोकेट सौ आसमा शेख, ह्यूमन राइट्स चे एजाज काझी, सोशल मीडियाचे व सामाजिक कार्यकर्ते ईसा यासीन तसेच जळगाव चे सर्व सहकारी व खास करून सौ. प्रतिभा शिरसाट,आदिवासी तडवी महिला मंडळाच्या पदाधिकारी यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्हा दंडाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे , गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी ,सहकारी व पहुर पो स्टे चे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, उप निरीक्षक अमोल गर्जे व सहकारी यांचे आभार मानलेले आहे.

फोटो
१) तपासी अधिकारी अमोल गर्जे यांचेशी जामनेर न्यायालयात चर्चा करताना शिष्टमंडळ
२) जामनेर न्यायालयात त्रयस्थ इसमा चे अर्ज व वकील पत्र अडव्होकेट रफिक शेख(जामनेर) यांना दिल्यावर त्यांचे सोबत शिष्टमंडळ

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!