
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था पुणे यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांच्या आयोजनातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्या सहयोगाने शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नवीन कांदा मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे दिनांक 14.09.2022 रोजी आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी हंगामात बाजार भाव कमी असताना धान्य न विकता वखार महामंडळच्या गोदामात साठवणूक करून मिळालेल्या वखार पावतीवर धान्य तारण योजने अंतर्गत राज्य सहकारी बँक व वखार महामंडळ यांच्या संयुक्त उपक्रमाने ब्लॉक चेन तंत्रज्ञानानुसार अगदी अल्प दरात म्हणजे फक्त 9 टक्के व्याज दराने मालाच्या किमतीच्या 70 टक्के पर्यंत कर्ज तात्काळ मिळते . तसेच वखार महामंडळा च्या गोदामात धान्य श्राशोक्त पद्धतीने साठवणूक केली जाते तसेच गोदामात ठेवलेला माल किडमुक्त राहील या साठी नियमित कीटकनाशके फवारणी व धुरीकरण करण्यात येते त्याच प्रमाने शेतमालाचा 100 टक्के विमा उतरावलेला असल्याने मालाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते,आणि शेतकऱ्यांना चालू सातब-यावरील पिकपेर प्रमाणे वखार भाड्यात 50 टक्के सवलत मिळते. या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मा. रामेंद्रकुमार जोशी, उपमहाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नाशिक विभाग, मा.नरेंद्र वाढवणे,सचिव कृ. उ. बाजार समिती व कर्मचारी वृंद,मा.सुधीर देशपांडे साहेब,सहाय्यक प्राध्यापक श्री.स्वप्निल कांबळे, कार्यक्रम सहाय्यक,वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था पुणे, तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नाशिक विभागातील कर्मचारी वृंद श्री.किरण उगले, श्री.किशोर पाटिल, श्री.भूषण पाटील, श्री.पद्माकर घुले श्री.काशिनाथ सदाफळ,श्री. स्वप्नील कुलथे व श्री. प्रल्हाद चौधरी, श्री.भाऊराव पवार,श्री. सतीश शिंदे,श्री.योगेश पाटील यांच्या उपसथितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले