वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी शहर तर्फे अण्णाभाऊ साठे यांचा रशिया येथील मास्को या ठिकाणी पुतळा उभारण्यात आल्याबद्दल आनंद उत्सव साजरा
हातकणंगले प्रतिनिधी संतोष कोठावळे

मॉस्को या ठिकाणी स्टेट लायब्ररीच्या
वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दि 14 रोजी अनावरण करण्यात आले त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी शहर तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून के एल मलाबादे चौक व आवळे मैदान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून उपस्थित सर्व नागरिकांना साखर व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी काही मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये सादर केला होता त्याच रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आले तसेच रशिया सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व साहित्याचा जो सन्मान केला त्याबाबत रशिया सरकारचे आभार इचलकरंजी येथे उपस्थित मान्यवरांच्या कडून व्यक्त करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे कोल्हापूर जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे , इचलकरंजी शहराध्यक्ष अॅड.महेश कांबळे, इचलकरंजी शहर कायदा आघाडी अध्यक्ष अॅड.गुंडूराव सावंत, इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष चित्तरंजन कांबळे, इचलकरंजी शहर रिक्षा आघाडी अध्यक्ष राजाराम माळगे, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे, इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष अरुणा व्हनमुखे मॅडम ,नेहरूनगर शाखा अध्यक्ष रंजीत दीक्षित, शहापूर शाखा अध्यक्ष गणेश कांबळे , कामगार चाळ परिसर अध्यक्ष सूरज निंबाळकर, शहापूर शाखा उपाध्यक्ष सागर कांबळे , शहापूर शाखा कार्याध्यक्ष मंगेश कांबळे आदिसह इचलकरंजी शहर वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.