राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या विभाग जिल्हा तर्फे महानगरपालिका आयुक्त त्याला निवेदन
प्रतिनिधी न्यानेश्वर महाडिक

जळगाव शहरात आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जळगाव जिल्ह्यातर्फे महानगरपालिका हद्दीतील उस्मानिया पार्क परिसरातील रस्त्यांच्या समस्येबाबत माननीय महापौर ताई व माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यात आले माननीय आयुक्त मॅडम व महापौर ताई यांनी आश्वासन दिले की येत्या दोन-तीन दिवसात ते उस्मानिया पार्क परिसरात स्वतः प्रत्यक्ष पाहणी साठी येणार आहे व त्वरित खडी व मुरूम च्या साहाय्याने रस्त्या दुरुस्त करण्यात येतील असे सांगितले.
यावेळी उपस्थित मजहर पठाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, नगरसेवक नवनाथ भाऊ दारकुंडे, रिजवान खाटीक महानगर अध्यक्ष अल्पसंख्यांक, मोहसीन शेख जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक, राजा मिर्झा जिल्हा सरचिटणीस,इद्रिस शेख अल्पसंख्यांक जिल्हा सचिव,जुबेर कादरी राष्ट्रवादी सदस्य व उस्मानिया पार्क परिसरातील नाझीम भाई,समीर भाई,इम्रान भाई मेडिकल वाले,देशमुख साहब,गालिब भाई,
झोहेद शेख,उजेफ कादरी,समी भाई लॅबवाले व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते