एम.एस.जी.एस इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आर्ट अँड क्राफ्टची कार्यशाळा संपन्न.

अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आर्ट अँड क्राफ्टची कार्यशाळा संपन्न झाली.नवीन अभ्यासक्रमाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबर सृजनात्मकतेची आवड निर्माण व्हावी म्हणुन स्कुल मध्ये गुजरात येथील अशोक बालहोट व दिपाल बालहोट यांनी रंगीत कागदापासून आकर्षक असे फुल, माला, बाहुली, कागदी पुष्गुच्छ इ. डिजाईन बनवणे असे विविध प्रकारचे कौशल्य शिकवले. कार्यक्रमाच्या शेवटी स्कुलच्या वतीने प्रिंसिपल अल्ताफ खान यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अजहर खतीब, अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अमजद अंसारी, मनीष सैंदाने, गौरव सैंदाने, अजीम पटेल, ऋषिकेश दुसाने, सुनीता वडे, चेतना माकूने, शर्मिला पवार, आलिया खान, सुश्मिता देशमुख, अनिता लचूरे आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.