
हातकणंगले तालुका या तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विघ्नहर्ता गणराया या गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात त्याच पद्धतीने हातकणंगले तालुक्यामध्ये वसलेले दुर्गेवाडी धरणग्रस्त गाव या गावांमध्ये देखील एक गाव एक गणपती या मंडळाकडून गणपतीची स्थापना केली जाते गेली दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार गणेश उत्सव साजरा करण्यात आला मुळात या मंडळाची कार्य कारणी दरवर्षी बदलली जाते परिणामी मागील देखील मंडळाच्या बॉडीने कोरोनाचा काळ असून देखील चांगल्या प्रकारे गणेश उत्सव साजरा केला होता त्यामध्ये अध्यक्ष दीपक पाटील .खजिनदार सुरेश वंकटे. आणि सेक्रेटरी शंकर पाटील होते . मुळात एक गाव एक गणपती तरुण मंडळाची स्थापना 2000 मध्ये झाली असून या मंडळाचे कार्य उल्लेखनीय रित्या असल्याचे दिसून येत आहे तसेच हा गणपती एक गाव एक गणपती असल्यामुळे व नवसाला पावणारा असल्यामुळे गणपतीच्या आरती साठी व दर्शन घेण्यासाठी नवस करण्यासाठी लांब लांबून भक्तगण भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात तसेच दिनांक 8 वार गुरुवार या दिवशी सत्यनारायण पूजा घालून बाप्पाच्या नावाचा महाप्रसाद मंडळाच्या कडून मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता व दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्थी विसर्जन मिरवणुकीमध्ये दुर्गेवाडीतील संपूर्ण नागरिक भाविक भक्तगण उपस्थित राहून बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले व
बाप्पाच्या विसर्जना वेळी दुपारी तीन वाजता महा आरती पार पडली त्यानंतर नवसाचा गणपती असल्यामुळे नवस करण्यात आली व लेझीम ढोल ताशा व डॉल्बी या वाद्यांमध्ये बाप्पाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली व बाप्पाचे विसर्जन करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष मारुती पाटील. खजिनदार सुरेश वंकटे. सेक्रेटरी किरण पवार. मंडळाचे सर्व कार्यकर्ते गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते