आमदार पंडातील दहा टक्के निधी पाणंद रस्त्यासाठी देणार आमदार राजू बाबा आवळे
हातकणंगले प्रतिनिधी

येत्या काळात आमदार पंडातून दहा टक्के निधी पानंद रस्त्यासाठी देणार असे मत राजू बाबा आवळे यांनी व्यक्त केले ते दि. 11 रोजी कुंभोज येथील पंचदीप मळा व तोरस्कर मळा या ठिकाणी पाणंद रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी तोरस्कर मळ्यातील रस्ता शुभारंभ राजू बाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले पाणंद रस्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून निधी मंजूर झालेल्या रस्त्याचे शुभारंभ मा. कोल्हापूर नगरसेवक मोहन सालपे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच अरुणादेवी पाटील या होत्या मुळात कुंभोज या गावासाठी आमदार फंडातून अडीज कोटी हून अधिक निधी गावातील विकास कामासाठी आमदार साहेबांनी दिला असून या माध्यमातून कुंभोज गावचा बराच विकास चांगल्या प्रकारे झाला आहे असे मत अरुणादेवी पाटील यांनी मांडले यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली या यावेळी राजाराम चे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी आपले मनोगत राजकीय धोरणावर मांडले प्रसंगी माजी उपसभापती राजू भोसले शरद चे संचालक आप्पासाहेब चौगुले माजी सरपंच माधुरी घोदे डॉ. धर्मवीर पाटील. अशोक आरगे. भारत भोकरे .आप्पासाहेब पाटील. सदानंद महापुरे. अजित देवमोरे. अमर बंडगर .कॉन्टॅक्टर शितल हेरले .कॉन्टॅक्टर रोहन चव्हाण .व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत गटनेते किरण माळी यांनी केले व आभार स्नेहा पाटील यांनी मांडले