भाजपा नालासोपारा शहर मंडळाची सभा बालाजी हॉल, नालासोपारा येथे संपन्न झाली.
सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी

नालासोपारा / दि. ११/०९ : भारतीय जनता पार्टी नालासोपारा शहर मंडळाची सभा नालासोपारा येथील बालाजी हॉल येथे सायं. ६.०० वा.संपन्न झाली.
ही सभा वसई विरार जिल्हा अध्यक्ष मा. राजनजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व नालासोपारा मंडळ अध्यक्ष मा. देवराज सिंगजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.
वसई विरार जिल्ह्याचे वरिष्ठ नेते श्री.जोगेंद्रप्रसाद चौबेजी यांनी दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करावा असे सांगितले तसेच बुथ रचनेबद्दल माहिती दिली. वसई विरार जिल्हाध्यक्ष मा. राजनजी नाईक यांनी मा.पंतप्रधान यांचा वाढदिवस हा पंधरवडा साजरा करून शहरात, विविध योजना व उपक्रम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घ्यावा असे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री.मनोज बारोट,युवा मोर्चा संघटन महामंत्री श्री विनीत तिवारी, नालासोपारा शहर मंडळ मंडळ सरचिटणीस श्री शशिकांत दूबे, श्री प्रमोद सिंह, मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा संध्या दुबे जी, उपाध्यक्ष श्रीमती पूनम बिड़लान, श्रीमती साधना त्रिपाठी, श्रीमती प्रियंका बांदेकर, श्री गणेश पवार, मंडल उपाध्यक्ष श्री राकेश पांडे, श्री प्रकाश वझे, मंडळ सचिव सुनील तिवारी , मुकेश पांडे, श्री अमित सिंह, राम सहाय कुशवाहा, कृष्ण शुक्ला, श्रीमती कीर्ति शर्मा , सतीश सिंह , मुनेश्वर गुप्ता , उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष श्री भानु सिंह , दिनेश चतुर्वेदी, युवा मोर्चा नेता कुणाल गुप्ता, रोहित गुप्ता, गोविंद गुप्ता, उत्तराखंड सेल जिल्हा अध्यक्ष श्री बिजेंद्र सिंह रौतेला ,उत्तराखंड सेल जिल्हा सरचिटणीस श्री तारा सिंह नेगी , उत्तराखंड सेल जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती दीपा बंगारी , कोकण मोर्चा संयोजक अनिल नारकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुहास पांचाळ, सोशल मीडिया सेल संयोजक दीपक दुबे, सह-संयोजक आनंद मिश्र, वार्ड क्र.६६ अध्यक्ष, सोशल मीडिया सेल सल्लागार व उत्तराखंड सेल जिल्हा मीडिया प्रभारी भगतसिंह रावत, उत्तराखंड सेल शहर अध्यक्ष हेमंत परिहार, उत्तराखंड सेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा रेनू तिवारी आणि शक्तिकेंद्र प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.