ताज्या घडामोडी

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन

कपील कट्यारे नाशिक

याजकडुन

*श्रद्धांजली !*

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले. अत्यंत दुःख झाले. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा असून देशातील दलित चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. १९८९ मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात आलेल्या विविध सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. राजकारणातील त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न, धान्य वाटपाच्या योजनेत त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी नेत्याला जनता कायमची मुकली आहे.

*भावपुर्ण श्रद्धांजली!*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close