कृषी
Trending

परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. भरपाई देण्याची मागणी.,,,,नंदु आबा सोमाशे

शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना मदत करावी

 एकनाथ भालेराव सायगाव

परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. भरपाई देण्याची मागणी.,,,,नंदु आबा सोमाशे

 

. येवला तालुक्यातील उत्तर पुर्व भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर,कांदा ,कांदा रोपे ,कपाशी ,मका चे प्रचंड नुकसान केले आहे सध्या सर्वत्र मका सोंगणी व कांदा बियाणे पेरणी सूरू असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या वर्षी‌ कोरोना महामारी असल्यामुळे मंजूरा अभावी मका सोंगणी ही घरच्या घरी व पडजी आडजीच्या करून मका , सोयाबीन, सोंगणी सूरु असुन सोंगणी केलेल्या मकाच्या बिटया व जनावरांसाठी लागणारा मकाचा चारा परतीच्या पावसाने खराब झाला आहे. मागे उतरा नक्षत्रात आलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या टाकलेली रोपे संपूर्ण खराब होऊन गेले असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले आहेत. व आता मका चे पिकं हे आता खराब होणार असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत.शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी नंदू आबा सोमासे यांनी केली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा अाहे. परंतू शेतकऱ्यांवर असा या या अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडले आहे. शासनाने मागे काही शेतकऱ्यांना कर्ज माफी केली पण अजुन बरेच शेतकरी हे कर्ज माफी मिळण्यापासून वंचित राहीलेले आहेत. शेतकऱ्यांना कधी दुष्काळी परिस्थिती तर जास्त पाऊसाने पिके खराब होऊन जाते या संकटात शेतकरी सापडले जातात. शेतकऱ्यांना त्यांचा संसाराचा गाडा चालविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर कसरत करावी लागते आहे. शेतकरी हा नेहमीच प्रयत्नवादी व आशावादी राहून शेतीकामात व्यस्त असतो. निसर्गाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे . शासनाने सरसकटपणे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी पूर्व भागातील युवा शेतकरी नंदू आबा सोमाशे यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.
[09/10, 8:45 am] EKNATH BHALERAW PRESS: कांदा पिकवयला काय लागत हे *ज्याला सोप वाटत असेल तर त्याला म्हनाव एकदा शेतकर्याच्या पोटी जन्म घे मग पहा व्यथा अरे सालभर पिकवल आणी हातात येण्याची वेळ आली तर या निसर्गांने एका रात्रीत हिसकावल अरे त्यात दोन पैसे मिळायची वेळ आली तर लगेच कांदा आयात सुरु खाना थोडे दिवस महाग कांदे काय मरश्याल का आयपत नसेल तर खाऊ नका पण आमच्या पोटावर मारु नका सध्या या ऊन्हामुळे कापुस वेचनीला आला होता व मका सोंगनी चालु होती सगळ गेलना पाण्यात तरी तुम्हाला दिसनार नाही तुमचे घोडे वराती मागून,शासनाने सरसगत पंचनामा करावे व शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी मागणी
शेतकरी, नंदू आबा सोमासे यांनी केली
( शेतकरी नंदू आबा सोमाशे
वाघाळे)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close