ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी प्रविण शिंदे

मुंबई महानगरपालिकेची बेस्ट सुविधा हि आशियातील सर्वोत्तम शासकीय प्रवासी वाहतूक सुविधा आहे.

बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी प्रविण शिंदे

खालापूर – समाधान दिसले

मुंबई महानगरपालिकेची बेस्ट सुविधा हि आशियातील सर्वोत्तम शासकीय प्रवासी वाहतूक सुविधा आहे. १८७३ मधे ट्रॉमवेच्या स्वरुपात सुरू झालेल्या BEST ला अंदाजे १५० वर्षांचा इतिहास आहे. १९२६ च्या काळात बेस्टने बस गाड्या चालवण्यास सुरुवात केली आणि मुंबईची रक्तवाहिनी बनली.

तर अंदाजे ४५०० बसेसचा ताफा असलेल्या ह्या BEST च्या समितीवर शिवसेना नगरसेवक प्रविणजी शिंदे हे विजयी झाले. गेली अनेक वर्ष नगरसेवक पद भूषविलेले तसेच मागील २ वर्ष बेस्ट समितीचे सदस्य असलेल्या प्रविण शिंदेंच्या खांद्यावर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे ह्यांनी विश्वासाने टाकलेली जबाबदारी त्यांनी स्विकारून 7 अॉक्टोंबर झालेल्या निवडणुकांमध्ये 8 – 5 ह्या फरकाने विजय मिळवला. मोठ्या विश्वासाने सोपावलेल्या ह्या जबाबदारीसाठी प्रविण शिंदे ह्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे तसेच शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर व शिवसेना उपनेते, परिवहन मंत्री अनिलजी परब ह्यांचे आभार मानले.

तसेच यावेळी जोगेश्वरीचे युवा नेतृत्व व प्रवीण शिंदे मित्र मंडळाचे सदस्य निखिल शिंदे तसेच पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते, सुशांत सावंत, विराज साळवी, अंकुर नारकर, धिरेन महाले, संदीप सावंत आदीनी प्रवीण शिंदे ह्यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close