ताज्या घडामोडी

कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

रोपांची प्रतीकारक शक्ती कमी होउन पुर्णपणे नष्ट होत आहे.

श्री शिवकुमार आनंद पोलिस टाईम्स विशेष प्रतिनिधी येवला तालुका

कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

एकीकडे कोरोणाने थैमान घालत असतांना दुसरीकडे कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. सध्या कांद्याचा दर वधारत असुन येवला तालुक्यातील शेतकरी लाल कांदा लागवडी साठी जोमाने लढत आहे. मात्र लागवड झालेल्या कांदा पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे नुकसानीने बळीराजा हैराण झाला आहे.

येवला तालुक्यातील मौजे नांदुर येथील शेतकरी शिवाजीराव भड यांनी 2 एकर क्षेत्रात कांद्याचे घरचे उळे (कांदा बी) टाकले. त्याची देखभाल करत उत्तम रित्या वाढ देखिल झाली. अचानक कांदा रोप माना टाकु लागले आहे. रोपांची प्रतीकारक शक्ती कमी होउन पुर्णपणे नष्ट होत आहे. हा प्रकार समजत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.कांदा लागवडी पासुन तर बाजारात नेण्यापर्यंत शेतक-यांना खुप मेहनण घ्यावी लागते.

असा येतो खर्च-

तीस हजार रुपयांचे कांदा बियाणे , कांदा लागवडीसाठी सात ते आठ हजार रुपये मजुरी लागते, औषधे व खतांसाठी सात ते आठ हजार रुपये असा एका एकरासाठी साधारण पन्नास ते साठ हजार रुपये इतका खर्च येतो. शिवाय रात्री व अपरात्री कांद्याला पाणी भरण्यासाठी डोळ्यात तेल घालुन उभे राहावे लागते. इतके सगळे मेहनत आणि खर्च करुनही शेतातील कांदा पिक नष्ट होतांना दिसत आहे. तेव्हा याची दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने पिकांचे पंचनामे करुन लवकरात लवकर भरपाई द्यावी , अशी शेतक-याची मागणी आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close