ताज्या घडामोडी

पोलिस टाइम्स येवला प्रतिनिधी महेश दारुंटे,येवला श्री बाळनाथ भीमनाथ हरिचंद्रे (गोसावी) यांची देवळाने विविध कार्यकारी सोसायटी व्हॉइस चेअरमनपदी बिनविरोध निवड……

देवळाने दुगलगाव येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी श्री. सोपान लासुरे तर व्हाईस चेअरमन पदी श्री .बाळनाथ भीमनाथ हरिश्चंद्रे (गोसावी)

पोलिस टाइम्स येवला प्रतिनिधी महेश दारुंटे,येवला

श्री बाळनाथ भीमनाथ हरिचंद्रे (गोसावी) यांची देवळाने विविध कार्यकारी सोसायटी व्हॉइस चेअरमनपदी बिनविरोध निवड……

येवला : देवळाने दुगलगाव येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी श्री. सोपान लासुरे तर व्हाईस चेअरमन पदी श्री .बाळनाथ भीमनाथ हरिश्चंद्रे (गोसावी)
(संचालक -सुप्रभात नागरी पतसंस्था येवला , माजी सरपंच)
यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री . योगेश उगलमुगले यांच्या अध्यक्षतेखाली संचालकाची बैठक घेण्यात आली.यावेळी सोसायटी चे सर्व संचालके उपस्थित होते . यावेळी चेअरमन पदासाठी सोपान लासुरे यांचा तर बाळनाथ हरिश्चंद्रे व्हाइस.चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. योगेश उगलमुगले यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले . यावेळी सचिव नागपूर, सहकारी वसंत रावजी जाधव तसेच नुतन चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार दुगलगाव सरपंच रावसाहेब लासुरे, अरुण बापू काळे,शिवाजी अण्णा कोटमे, लक्ष्मण संत , वाल्मीक जी काळे, घोडेराव जी गुरुजी,गोरख लासुरे, सुखदेव काळे, याच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी सरपंच माजी. महेंद्रजी जाधव, अशोक भाऊ काळे, बाबासाहेब अभिमन्यू काळे, निवृत्ती दाभाडे, निवृत्ती बोर्डे, बाळासाहेब दाभाडे, संतोष तुपे, वेननाथ काळे, कचेश्वर काळे, खंडू देवरे, लक्ष्मण कोटमे,नारायणजी बोंबले , सदाशिव निकम,प्रतिनिधी श्रीनाथ हरिचंद्रे, गावातील आजी माजी ग्रा प सदस्य संचालक व गावातील नागरिक उपस्थित होते ..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close