ताज्या घडामोडी

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर 9 अॉगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन खालापूर – समाधान दिसले

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर 9 अॉगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन

खालापूर – समाधान दिसले

रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे शुक्रवार 9 अॉक्टोबर रोजी सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने न्याय हक्क व विविध मागण्यांसाठी धरणे व ठिय्या आंदोलनाचे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यत करण्यात आले आहे. या संबंधीची नियोजन बैठक खोपोली येथे आयोजित करण्यात आली या बैठकीत सकल मराठा समाज समन्वयक समितीचे विनोद साबळे, सुनील पाटील यांच्या अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या बैठकीत खोपोलीसह खालापूर तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित राहून होणाऱ्या या आंदोलना संदर्भात चर्चा केली.

याप्रसंगी सकल मराठा समाज रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे, जिल्हा समन्वयक तथा खोपोली नगरपालिका गटनेते – नगरसेवक सुनिल पाटील, खोपोली उपनराध्यक्षा विनिता कांबळे, नगरसेविका प्रमिला सुर्वै, शेलार मामी, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटिल, अनिता पाटील, रामचंद्र जाधव, सुर्यकांत देशमुख, मनसे उपजिल्हाध्यक्ष जे.पी.पाटील, सचिन कर्णुक, भरत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, आत्माराम पाटील, रमेश खांडेकर, मंगेश दळवी, अनंत पाटील, दशरथ मंडावले, किसन पाटील, गोपाळ पाटील, किशोर आसवले, हरिश काळे, अमोल जाधव, अर्जुन वावंढळ, केतन घारे, दिनेश थोरवे, शशिकांत देशमुख, तानाजी पाटी, अनंत चव्हाण, दिपक जगताप, हिरोजी देशमुख आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close