क्राईम

शेत जमीन विक्रीत फसवणूक ; ५ जणांवर गुन्हा  दाखल पोलीस टाईम्स मालेगांव तालुका प्रतिनिधी:-मनोहर पानसरे

मालेगाव - तालुक्यातील जळगाव येथील सुरेश रघु काळे ( ३५ ) या शेतकऱ्याची शेतजमीन विक्री प्रकरणी खोटे करारनामे ,

 

शेत जमीन विक्रीत फसवणूक ; ५ जणांवर गुन्हा  दाखल

पोलीस टाईम्स मालेगांव तालुका प्रतिनिधी:-मनोहर पानसरे

8/10/2020
मालेगाव – तालुक्यातील जळगाव येथील सुरेश रघु काळे ( ३५ ) या शेतकऱ्याची शेतजमीन विक्री प्रकरणी खोटे करारनामे ,• हमीपत्र तसेच खोटे चेक देवून फसवणूक केल्याप्रकरणी किशोर राघो माने व त्याचे सोबतचे चार जणांवर न्यायालयीन आदेशान्वये छावणी पो . ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . १६ ऑगस्ट २०१७ ते १७ जुलै २०२० दरम्यान येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही घटना घडली . किशोर राघो माने याने संगनमत करुन पेट्रोल पंपाची डिलरशीप मिळावी म्हणून फिर्यादी सुरेश काळे यांच्या मालकिची शेत गट क्र . ५६६/१ पैकी ४० आर जमीन विकत घेत ली या जमीनीची एकूण किंमत ४१ लाख ११ हजार १११ पैकी ३ लाख ९ ० हजार फिर्यादीस देवून उर्वरित रक्कमेचे एप्रील २०२० चे महाराष्ट्र बँकेचे चेक लिहून सही करुन दिले यावेळी किशोर माने कडून आरोपी क्र . २ याने मिळकती २० आर क्षेत्र विकत घेतले आरोपी क्र .३ याने किशोर माने कडून चेक वटले नाही तर फिर्यादीस त्याच्या बँकेतून चेक वटवून देण्याचे हमीपत्र दिले आरोपी क्र .५ यानेही हमी म्हणून कोटक महिंद्रा बँकेचा चेक दिला . सदर मिळकतीतील आरोपी क्र . २ याने आरोपी क्र . १ कडून विकत घेतलेली जमीन आ.क्र .४ यास विकली अशा प्रकारे पाचही जणांनी पुर्व नियोजित करानुसार फिर्यादीची जमीन फुकटात हडपण्याच्या उद्देशाने खोटे करारनामे , खोटे चेक , हमीपत्र देवून केली फसवणूक म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास सपोनि पाटील करीत आहेत .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close