ताज्या घडामोडी

नवरात्र उत्सव साजरा करणेबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर

कपील कुट्यारे निशिक

कपील कट्यारे नाशिक प्रतीनीधी:- नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सव साजरा करणेबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून सर्व नवरात्र उत्सव मंडळ व भाविकांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केलेले आहे.

✅कोविड-१९ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव, दुर्गा पुजा,दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सार्वजनिक उत्सव प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता मंडप स्टेज उभारण्यास ऑनलाईन परवानगी देणेची व्यवस्था करण्यात आली आहे. मा. शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनपा हद्दीतील सर्व सार्वजनिक मंडळ, नागरिक तसेच संबंधित यांचे साठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत त्या जाहीर सूचनांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांनी महापालिका व स्थानिक प्रशासन यांची यांचे धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.

✅कोविड-१९ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा.न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश व महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपात बाबतचे धोरण त्याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे. यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्यानुसार करण्यात यावी.देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळा करीता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूट मर्यादित असावी या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्ती ऐवजी घरातील धातू ,संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्र उत्सवा करिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करावी. गरबा-दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम,शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि त्या माध्यमातून कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे तरतुदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनास ही सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रीनिगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे(फिजिकल डिस्टनसिग) तसेच स्वच्छतेचे नियम(मास्क,सँनिटायझर) इत्यादी पाळण्याकडे दृष्टीने विशेष दक्षता घ्यावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनाच्या वेळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्ती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे संस्था लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समिती निहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पाण्याची व्यवस्था करण्यास मनाई असेल. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती व तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असेल तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

✅दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणाऱ्या रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतीकात्मक स्वरूपाचा असावा. रावण दहना करिता करताना आवश्यक तेवढ्या किमान व्यक्ती कार्यक्रम स्थळी हजर राहतील प्रेक्षक बोलवू नये. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करावी असे आवाहन नाशिक महानगर पालिकेच्या वतीने मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close