क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

खोपोलीत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे दांपत्य म्हणजे काळे दांपत्य खालापूर – समाधान दिसले

राजकीय पटलावरील झुंझार युवानेतृत्व हरेशजी काळे

खोपोलीत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे दांपत्य म्हणजे काळे दांपत्य

खालापूर – समाधान दिसले

राजकीय पटलावरील झुंझार युवानेतृत्व हरेशजी काळे

सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे अनेक नेतृत्व खोपोली शहराला लाभले असून यातील निवडकच नेतृत्वाने सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचे चित्र पाहायला मिळाले. असाच एका दांपत्याने खोपोलीकरांच्या मनावर आपला आगळा वेगळाच ठसा उमटवता दिसत आहे तो म्हणजे शिवसहकार सेना खोपोली शहर संघटक हरेश काळे व नगरसेविका वनिता काळे दांपत्य.

आपण ज्या समाजात जन्म घेतो – वावरतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनातून ठेवून हरेश काळे यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरूवात केली. मात्र सामाजिक कार्य करताना राजकीय पाठबळ मिळावे म्हणून काळे यांनी राजकीय प्रवाहाला प्रारंभ केल्यानंतर राजकीय पटलावरून विविध समाज हिताचे काम राबवित आहे. ही समाज हिताची कार्य पार पडताना असताना सर्वसामान्यांना आपुलकी आणि सन्मानाची वागणूक देत त्यांना वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचे व सुविधांचे महत्त्व पटवून सुद्धा देत आहेत. तर एखादे काम करताना ते स्वतःला झोकून देत कोणताही भेदभाव न करता सर्वामध्ये मिळून मिसळून जात असतात, हीच त्याची वेगळी ओळख असून राजकीय वाटचालीबरोबर सामाजिक कार्य करताना मोलाची साथ मिळाली ती त्याच्या पत्नी वनिता काळे यांची.

सामाजिक कार्य करीत असताना काळे दांपत्य स्वतःच्या खिशाला कात्री लावून मनात कोणताही विचार न आणता सढळ हाताने सामाजिक कार्य करीत आहेत. याच त्या सामाजिक कार्यामुळे अनेक तरुणांचे ते आयकॉन व आदर्श बनू लागले आहे.

तर काळे दांपत्याचा कामाचा आढावा खालीलप्रमाणे पहा.

१) विविध क्रीडा सामन्याचे आयोजन.

२) धाकटी पंढरी येथे अखंड हरिनाम सप्ताहमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून महाप्रसादाचे आयोजन.

३) गोरगरीब लोकासाठी हॉस्पिटल असो वा लग्नकार्यासाठी सढळ हाताने मदत.

४) उमरजी पटेलनगर मधील दरवर्षी होणाऱ्या जवळपास १८ घरगुती गणपती विसर्जन मिरवणुक मोफत.

५) आनंदाच्या क्षणी विविध धान्याचे वाटप.

६) नवरात्र उत्सवात दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन.

७) कोरोना काळात प्रतिकार शक्ती वाढीसाठी मोफत गोळया वाटप.

८) मास्क वाटप.

९) नगरसेविका वनिता काळे यांच्या वाढदिवासानिमित्त भव्य आरोग्य शिबिर.

१०) ज्येष्ठ नागरिकांना चटई वाटप.

११) हरीश काळे यावाढदिवसानिमित्त डोळे तपासणी,
मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व
मोफत चष्मे वाटप.

१२) लहान आदिवासी मुलांना नवीन मोफत कपडे वाटप.

१३)कोरोना काळात आदिवासी बांधवांना घरोघरी जाऊन धान्य किट वाटप.

१४) शिवजंतीनिमित्त यशवंतनगर येथे कीर्तनाचे आयोजन.

१५) दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेय वस्तूचे वाटप.

१६) ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व त्यांना फळे वाटप.

१७) गरीब व गरजू लोकांना मोफत शिवभोजन.

अशा विविध प्रकारची मदत ही काळे दांपत्य करीत असल्याने यांच्या कार्याचा सर्वाना हेवा वाटत आहे.

हरेश काळे यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्य प्रामाणिकपणे करत असल्याने त्याच्या कामाची पोचपावती म्हणून महाराष्ट्र अग्रगण्य खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक १० मधून त्याच्या पत्नी वनिता काळे ह्या मोठ्या मताधिक्याने शिवसेनेच्या गटातून विजयी झाल्यानंतर त्याच्या सामाजिक कामाचा व्याप अधिकच वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

तर हरेश काळे ह्यावर पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र प्रभारी व शिवसहकार सेना संघटक खोपोली शहर अशा महत्त्वाच्या पदाची जबाबदारी असून या काळे दांपत्याला पुढिल उज्वल राजकीय व सामाजिक कार्याच्या वाटचालीकरीता मनपूर्वक शुभेच्छा…….

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close