ताज्या घडामोडी

एकनाथ भालेराव येवला येवला तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा ,,,,,, येवला तालुका प्रहार संघटनेमार्फत तहसील दार यांना निवेदन

एकनाथ भालेराव येवला

एकनाथ भालेराव येवला

येवला तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा ,,,,,, येवला तालुका प्रहार संघटनेमार्फत तहसील दार यांना निवेदन

यावर्षी येवला तालुक्यामध्ये कांदा, मका ,सोयाबीन ,भुईमूग इत्यादी पिकांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बरेच पिके तर शेतीत जास्त पाण्यामुळे सडून गेली आहे मक्या सारखे पीक आज पाण्यात उभे असताना आणि कांद्या सारखे पीक हे शेतीमध्ये लावून पण दिसत नसताना कृषी सहाय्यक हे पाण्यात पीक असेल तरच पंचनामे करीत आहे तर तहसीलदार साहेबांनी त्वरित कृषी अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यास सांगावे अन्यथा प्रहार संघटनेमार्फत अति तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी माननीय तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल फरताळे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन पवार, गणेश लोकरे, रामभाऊ नाईकवाडी ,शंकर गायके, गोरख निर्मळ ,जनार्दन गोडसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————-
कांदा पिकाचे 80 ते 90 टक्के नुकसान झालेले असताना कृषी सहाय्यक कांदा पिकाचे पंचनामे करण्यास नकार देत आहे. अशा कृषी सहायकांना त्वरित कृषी अधिकाऱ्यांमार्फत नुकसान झालेले पिकाचे पंचनामे करण्यास सांगण्यात यावे. असे तहसीलदार यांना सांगण्‍यात आले.
अमोल फरताळे
प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाप्रमुख

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close