ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील पूर्व भागातील भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे

पहिल्या फेरीत लोकसंख्येचे सर्वेक्षण करून त्यांचे ऑनलाईन एंट्री करण्यात येत आहे व दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा स्क्रीनिंग करणार

एकनाथ भालेराव सायगाव:-

येवला तालुक्यातील पूर्व भागातील भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे यात प्रत्येक कुटुंबात स्वतःची माहिती देऊन काळजी घेणे आवश्यक आहे यात भारम गावातील प्रत्येकाची माहिती घेण्याची मोहीम राबवली आहे या मोहिमेत दोन फेऱ्याचे आयोजन केले पहिल्या फेरीत लोकसंख्येचे सर्वेक्षण करून त्यांचे ऑनलाईन एंट्री करण्यात येत आहे व दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा स्क्रीनिंग करणार आहे या सर्वेक्षणा दरम्यान कोरोणा आजाराच्या सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हितेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून आमच्याकडून सर्व सहकार्य त्यांना लाभेल येथील सर्व कर्मचारी एकदम उत्तम रित्या काम करत आहेत यावेळी डॉक्टर जितेंद्र गायकवाड डॉक्टर मनीषा सांगळे डॉक्टर स्वाती करपे आणि आरोग्य कर्मचारी आशा व स्वयंसेवक येथील सरपंच ग्रामसेवक आदींचे सहकार्य या मोहिमेदरम्यान लाभत आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close