आरोग्य व शिक्षण

कोरोना संसर्ग आजारावर मात करून गटविकास अधिकारी बालाजी पुरी पोहचले पुन्हा दप्तरी , अनेकांनी केला सत्कार ! कर्जत : विजय डेरवणकर

 

कोरोना संसर्ग आजारावर मात करून गटविकास अधिकारी बालाजी पुरी पोहचले पुन्हा दप्तरी , अनेकांनी केला सत्कार !

कर्जत : विजय डेरवणकर

कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.बालाजी पुरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असता उपचारासाठी ते होम कोरंटाईन झाले होते.या महामारीतून उपचार करून ते सहीसलामत सुखरूप घरी आले.घरी येऊन त्यांची तब्बेत व्यवस्थित झाल्यावर कर्तव्यदक्ष होण्यासाठी कर्जत पंचायत समिती कार्यालयात आज दाखल झाले. त्यांनी कोरोना लढा देऊन कार्यालयामध्ये आले म्हणून कार्यालयातील अनेक अधिकारी,कर्मचारी,पत्रकार यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा ” कोरोना योद्धा “म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी श्री. बालाजी पुरी यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे कार्याध्यक्ष पत्रकार – प्रशांत खराडे यांनी स्वागत व सत्कार केले,व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या,यावेळी कर्जत तालुका विस्तार अधिकारी श्री.सुनील अहिरे तसेच शाखा अभियंता श्री.सुजित धनगर आदी उपस्थित होते.
.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close