क्राईम

हाथरसची घटना लोकशाहीला घातक व काळीमा फासणारी – मकरंद सोनवणे

लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या व

हाथरसची घटना लोकशाहीला घातक व काळीमा फासणारी – मकरंद सोनवणे

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार करून जिवे मारून टाकण्यात आल्याची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना तिचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ न देताच पोलिसांनी रातोरात परस्पर अंत्यसंस्कार केले. त्या कुटुंबियांच्या भेटीसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुलजी गांधी व प्रियंका गांधी भेटण्यासाठी गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्याचा निंदनीय प्रकार घडला. या दोन्ही घटना लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या व धोक्याच्या असून त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व खा. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूलचे सभापती श्री मकरंद सोनवणे यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसाकडून धक्काबुक्की करण्यात आली तसेच कार्यकर्त्यावर लाठीचार्ज करण्यात आला. उत्तर प्रदेशातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारून टाकण्याची अमानुष घटना घडली. ही मुलगी मृत्युमुखी पडल्यावर घरी आणून तिच्या कुटुंबियांच्या पद्धतीने अंत्यविधी करण्याची गरज असताना पोलिसांनी कुटुंबियांना डांबून ठेवून रातोरात परस्पर अंत्यविधी केला. म्हणून ही माणुसकीला काळीमा फासणारी व लोकशाहीला घातक अशी घटना असून यामध्ये उत्तर प्रदेश सरकारचा ही हात असण्याला वाव मिळत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूल च्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
संबंधित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेली असताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करण्याची गरजच नव्हती. देशातील एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख नेत्याला अशी वागणूक मिळते तर सामान्य कार्यकर्त्यांचे काय ? ही बाब अत्यंत निषेधार्थ व लोकशाहीला घातक आहे. कुठल्याही पीडित चे अश्रू पुसण्यासाठी शांततेने भेटायला जाणाऱ्या लोकांना अशी वागणूक दिली जाते हे अत्यंत घृणास्पद आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूलच्या वतीने निषेध करण्यात येत असून त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व खा.गांधी यांना धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी मकरंद सोनवणे यांनी केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close