महाराष्ट्र

दिव्यांगांचे वाटेला शासकीय दरबारी उपेक्षाच,*

*दिव्यांगांचे वाटेला शासकीय दरबारी उपेक्षाच,*

 बबलु मिर्झा, नाशिक*

*नैसर्गिक आलेले दुर्दैवी दिव्यांगत्व, व समाज व शासनाकडुन होणारी उपेक्षा ने दिव्यांग घटक हतबल झालेला दिसत आहे,*
*दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी जवळपास 500 शासणनिर्णय झालेले आहेत, परंतु आजही दिव्यांग व्यक्ती ह्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहे, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ सहजासहजी मिळत नाही अशी परिस्थिती सर्व दिव्यांग व्यक्तींची आहे, दिव्यांग असतानाही दिव्यांग प्रमाण पत्र काढण्यासाठी करावे लागणारे दिव्य हे प्रत्येक दिव्यांग व्यक्ती ने अनुभवलं आहे, शरिराने जरी दिव्यांग असले तरी त्याला शासनाची मोहर लागल्या शिवाय कोणताही लाभ मिळत नाही, व त्या साठी दिव्यांग व्यक्तीना जिल्हा रुग्णालयातुन दिव्यांग प्रमाण पत्र घेणे आवश्यक आहे, परंतु दुर्दैवी ठरलेला दिव्यांग हा अनेक हेलपाटे मारुन कसेबसे दिव्यांग प्रमाण पत्र मिळवतो, सुरवातच खडतर प्रवासाने होते, आता पर्यंत तिन ते चार वेळा दिव्यांग व्यक्ती ना दरवेळी बदलणारे शासनाच्या निर्णयामुळे दिव्यांग प्रमाण पत्र कायमस्वरूपी असतानाही बदलावे लागते, सध्या केंद्र सरकारने यु आय डी कार्ड हे एकच सर्व सवलतीना ग्राह्य धरले जाणार असल्याचे परिपत्रक काढले आहे, परंतु दोन महिने पुर्वी केंद्र सरकारच्या च रेल्वे विभागाने यु आय डी कार्ड ची प्रत घेऊन हस्ताक्षरात लिहिलेले दर्जाहीन प्रतिचे रेल्वे ओळखपत्र देऊन रेल्वे प्रवासात सवलत दिली जात आहे, केवळ समन्वयाचा अभाव असल्याने दिव्यांग व्यक्ती ना या ना त्या कारणाने भरडले जात आहे, दिव्यांग असणे हाच त्याचा गुन्हा झाला आहे अशी भावना दिव्यांगांमध्ये निर्माण झाली आहे*
*कोणतीही ठोस शासकीय योजना दिव्यांग व्यक्ती ना लाभ देत नाही, अगदी तुटपुंजी मदत दिली जाते, त्यातही अनेक अटी शर्ती लावुन दिव्यांगांना त्यांचे हक्क व आधिकार यांचे पासुन वंचित ठेवण्यात असल्याने दिव्यांगांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत, सर्वांत जास्त फटका हा संजय गांधी निराधार योजना चे दिव्यांग व्यक्तींचे प्रकरण अनेक अटी शर्ती लावुन नामंजूर करण्यात येते, दिव्यांग व्यक्ती ना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा अनुदान देण्यात येते महाराष्ट्र राज्यात एकुण दिव्यांग व्यक्तींच्या संख्येच्या फक्त तीस टक्के दिव्यांग व्यक्ती ना या योजनेचा लाभ मिळतो, उर्वरित सत्तर टक्के दिव्यांग व्यक्ती हे या योजनेपासुन वंचित आहेत, व ज्या दिव्यांग लाभार्थींना लाभ मिळतो तो ही तीन तीन महिने उलटल्यावर मिळतो, व जे नवीन दिव्यांग या योजनेसाठी अर्ज करतात त्यांना अटी शर्ती लावल्या जातात, एकिकडे केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती ना त्यांचे हक्क व आधिकार बाधित रहावे, त्यांना समाजात व शासनदरबारी सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचे हक्क व पुनर्वसन तसेच संरक्षण व्हावे यासाठी दिव्यांग आधिकार कायदा 2016 केलेला आहे, व दुसरीकडे याच दिव्यांग वर्गाला नियम व अटी शर्ती लावुन एकप्रकारे दिव्यांग व्यक्ती ना परावृत्त ठेवले जात आहे, मुळात दिव्यांग व्यक्तींचा समावेश संजय गांधी निराधार योजनेत न करता स्वतंत्र दिव्यांग पेन्शन योजना सुरू करावी कारण संजय गांधी निराधार योजना चे नियम हे निराधार, विधवा, परित्यक्ता, तृतीयपंथी यांचा समावेश असल्याने तेच नियम दिव्यांगांना लावले जात आहे,*
*या कडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे, दिव्यांग व्यक्ती ना फक्त दिव्यांग नाव बदलुन फरक पडणार नाही तर त्यांना प्रामुख्याने कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, नवीन आलेल्या शासन परिपत्रक नुसार ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्ती ना रोजगार हमी योजनेंतर्गत 100 दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या व तक्रारीची दखल घेण्यासाठी गटविकास अधिकारी यांना तक्रार निवारण आधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, परंतु फक्त पत्र देऊन सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा अमलबजावणी होते की नाही याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, राज्यातील सर्व जिल्हा परिषद यांना दिव्यांग आधिकार कायदा समजण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेश आहेत परंतु कार्यवाही नाही, या बाबत दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे हे ही उदासीन असल्याचे दिसते, फक्त पत्र व्यवहार करुन दिव्यांगांचे समस्या सुटणार नाहीत तर त्याची काटेकोरपणे अमलबजावणी झाली पाहिजे तरच दिव्यांग व्यक्ती ना न्याय मिळेल, या बाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे, दिव्यांगांचे व्यथा व वेदना खुप आहेत , ” परंतु हार मानेल तो दिव्यांग कसा ” दिव्यांग हा जरी शारिरीक असला तरी त्याची मानसिक ईच्छा शक्ती ही प्रबळ आहे, त्यास शासनाने फक्त थोडा आधार प्रामाणिकपणे देण्याची गरज आहे,*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close