ताज्या घडामोडी

रब्बी हंगामासाठी शेतीपंपास दिवसा विद्युत पुरवठा दया…..* एकनाथ भालेराव प्रतिनिधी

सायगावकरांची शासनाकडे मागणी....*

*रब्बी हंगामासाठी शेतीपंपास दिवसा विद्युत पुरवठा दया…..*

एकनाथ भालेराव प्रतिनिधी

*सायगावकरांची शासनाकडे मागणी….*

*विद्युत वितरण कंपनीने आक्टोंबर २०२० चे शेतीपंपाचे थ्री फेज विदयुत पुरवठा वेळापत्रक नांदगाव मनमाड येवला झोन साठी जाहीर केले या वेळापत्रकानुसार रात्री ८ .०५ ते सकाळी ६ : ०५ या वेळेत ४ दिवस रात्रीचा विजपुरवठा दिला जाणार असुन तिन दिवस दिवसा सकाळी ७ : ०५ ते दूपारी ३ : ०५ लाईट राहिल.असे शेतकऱ्यांच्या पूर्ण गैरसोईचे वेळापत्रक जाहिर झाल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असुन शेतीसाठी आठवडाभर दिवसा थ्री फेज विज पुरवठा करावा अशी मागणी तालूक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघ सल्लागार समिती संचालक भागुनाथ उशीर, एन्झोकेम संचालक रघुनाथ खैरणार, मा.सरपंच गणपत खैरणार, सुनिल देशमुख, सेवानिवृत्त कृषी आधिकारी अशोक कुळधर आदिंनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, उर्जामंत्री,पालकमंत्री यांचे कडे निवेदना०दारे केली आहे.*

*येवला तालूक्यात अतिवृष्टीने पिकांचे आतोनात नुकसान होऊन शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. यापूर्वी झालेल्या कांदा लागवड व रोपांच दैननिय अवस्था व रांगडया कांदाच्या लागवडीसाठी, कपाशी व इतर पिकांना आक्टोबर मधील उष्ण वातावरणाच्या (आक्टोंबर हिट ) पाश्र्वभुमीवर पिकांना पाणी देणे आवश्यक असतांना रात्रीचा चार दिवस विज पुरवठा असल्याने पिकांना पाणी देणे जिकरिचे होणार आहे. डी.पी. इलेक्ट्रीक मोटार विहीरीजवळ सलगच्या पावसाने प्रचंड गवत झाले आहे. जंगली श्वापद व सर्पाची प्रचंड भिती असुन रात्री पिकांना पाणी देणे म्हणजे जिवाचा धोका पत्करून मोठी दूर्घटना घडण्याची शक्यता आहे. रात्रपाळीच्या विद्युत पुरवठयात मेन लाईन किंवा डिपी जर काही समस्या निर्मान होउन विजपुरवठा खंडित झाला तर रात्री कर्मचारी उपलब्ध होत नाही.परिणामी अख्या रात्रीचा विजपुरवठा कालावधी वाया जातो.जो पर्यंत पाउस पडत होता तो पर्यंत विज बोर्डाने ५ तास जवळपास दिवसा लाईट दिली व आता पिकांना पाणी देण्याची वेळ आली तर रात्रीचा थ्री फेज विदयुत पुरवठा शेतीपंपासाठी सुरू केला आहे. कृषीप्रधान देशात “बाप भिक मागु देईना आई जेऊ घालीना ! ” अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वेळेचे नियोजन करणाऱ्या आधिकाऱ्यांच्या सवंदेना हरवल्या काय? अशी भावना शेतकरी वर्गात निर्मान झाली आहे. शासनाने या प्रश्नी गंभीर पणे लक्ष घालून माहे आक्टोंबर २०२० ते मार्च २०२१ या रब्बी हंगामाकरिता शेतीपंपासाठी थ्री फेज विदयुत पुरवठा दिवसाच करावा अशी मागणी ही या निवेदनात करण्यात आली आहे.*

*शेतीपंपाच्या थ्री फेज विदयुत पुरवठ्याचे वेळापत्रक ज्या अधिकाऱ्यांनी तयार करुन आंम्हाला रात्रभर शेतात राबण्यासाठी रात्रीची विज दिली ते आधिकारी रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीत त्यांचे ऑफिस चालू शकतील का?*
*रघुनाथ खैरणार*
*प्रगतीशील शेतकरी सायगाव*

*रात्रपाळीत शेतावर पाणी भरतांना जंगली श्वापद, सर्पदंश झाल्यास शासन जी आर्थिक मदत करते त्या ऐवजी शेतीला दिवसा विज दयावी म्हणजे हि समस्याच उद्भभवणार नाही..*
*भागुनाथ उशीर*
ȳ*मा.चेअरमन*
*खरेदी विक्री सह संघ येवला*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close